एयरटेलच्या ग्राहकांना अमेझॉन प्राईमची मोफत सेवा

0
Airtel

एयरटेलने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी अमेझॉन प्राईम या व्हिडीओ ऑन डिमांड सेवेला मोफत देण्याची घोषणा केली आहे.

अमेझॉन कंपनीने अलीकडेच लाँच केलेली अमेझॉन प्राईम ही सेवा खूप लोकप्रिय झाली आहे. यात चित्रपट, दूरचित्रवाणी कार्यक्रम, डॉक्युमेंटरीज, स्पोर्टस् शोज आदींचा समावेश आहे. सध्या ९९९ रूपये प्रति वर्ष इतक्या दरात ही सेवा उपलब्ध आहे. आता मात्र एयरटेलच्या पोस्टपेड ग्राहकांना अगदी एक रूपयादेखील खर्च न करता याचा वर्षभर आनंद घेता येणार आहे. अर्थात एयरटेलने आपल्या इन्फीनिटी प्लॅन्सच्या ग्राहकांनाच ही सुुविधा दिली आहे. यात ४९९, ७९९ आणि ११९९ रूपये प्रति महिना या प्लॅन्सचा समावेश असेल. अर्थात यापैकी कोणताही प्लॅन असणारा ग्राहक याचा लाभ घेऊ शकतो. यासाठी युजरला आपल्या स्मार्टफोनमध्ये एयरटेलचे टिव्ही अ‍ॅप इन्स्टॉल करावे लागणार आहे. यानंतर ग्राहक आपल्या फोन नंबरच्या मदतीने लॉगीन करून अमेझॉन प्राईम सेवेचा एक वर्षापर्यंत लाभ घेऊ शकेल. दरम्यान, एयरटेल आपल्या ४९९, ७९९ आणि ११९९ रूपयांचा प्लॅन घेणार्‍या ग्राहकांना प्रति-महिना अनुक्रमे ३०, ५० आणि ७५ जीबी फोर-जी डाटा देणार असून याच्या जोडीला अमर्याद स्थानिक आणि एसटीडी कॉल्सचाही समावेश असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here