एयरटेलचा १४९ रूपयांचा सुधारित प्लॅन

0
Airtel

एयरटेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी १४९ रूपयांचा प्लॅन आता सुधारित अवस्थेत सादर केला असून यातून युजर्सला जास्त डाटा देण्यात येणार आहे.

एयरटेलने गेल्या महिन्यातच १४९ रूपयांचा प्लॅन हा नव्याने सादर केला होता. याच्या अंतर्गत ग्राहकांना दररोज एक जीबी डाटा २८ दिवसांपर्यंत मिळणार होता. तसेच यात ग्राहक अमर्याद स्थानिक आणि एसटीडी कॉल करू शकत होते. तर दररोज १०० एसएमएसची सुविधादेखील देण्यात आली होती. आता हा प्लॅन नव्याने सादर करण्यात आला आहे. यात ग्राहकांना दररोज २ जीबी डाटा देण्यात येणार आहे. याची वैधता २८ दिवसांची आहे. अर्थात या प्लॅनमध्ये ग्राहकाला एकंदरीत ५६ जीबी इतका डाटा मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे १४९ रूपयात अन्य कोणतीही कंपनी इतका डाटा देत नसल्यामुळे एयरटेलला याचा लाभ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यात आधीप्रमाणेच ग्राहक अमर्याद स्थानिक आणि एसटीडी कॉलींगचा लाभ घेऊ शकणार आहे. याच्या जोडीला दररोज १०० एसएमएसची सुविधादेखील असणार आहे. हा प्लॅन पहिल्यांदा मोजक्या सर्कलमध्ये देण्यात आला असला तरी लवकरच याला देशातील सर्व सर्कलमध्ये लागू करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here