एयरटेलचा धमाका: अवघ्या १,३९९ रूपयात फोर-जी स्मार्टफोन

0

एयरटेल कंपनीने फक्त १,३९९ रूपये मूल्यात फोर-जी कनेक्टिव्हिटी असणारा स्मार्टफोन लाँच केला असून यामुळे जिओफोनला मोठे आव्हान उभे राहणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून फोर-जी स्मार्टफोनमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. विशेषत: रिलायन्सने जिओफोनच्या माध्यमातून अत्यंत किफायतशीर पर्याय सादर केला असून याला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद लाभला आहे. या पार्श्‍वभूमिवर अन्य कंपन्या अस्वस्थ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे या कंपन्यांनीही जिओफोनला आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यात एयरटेलसह आयडिया, बीएसएनएल आदींनी स्वस्त हँडसेट निर्मितीचे प्रयत्न सुरू केली होते. यात आज एयरटेलने अवघ्या १,३९९ रूपये मूल्यात स्मार्टफोन सादर करून धमाल उडवून दिली आहे.

एयरटेल कंपनीने कार्बन हा फोन उत्पादक कंपनीसोबत करार करून हे नवीन मॉडेल लाँच केले आहे. यात युट्युब, व्हाटसअ‍ॅप आणि फेसबुक हे अ‍ॅप प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आले आहेत. याशिवाय यात माय एयरटेल अ‍ॅप, एयरटेल टिव्ही आणि विंक म्युझिक हे अ‍ॅपही प्रिलोडेड अवस्थेत असतील. याला कार्बन ए४० हे नाव असेल. यात ४ इंच आकारमानाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. याची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविता येईल. तर यातील मुख्य आणि फ्रंट कॅमेरे अनुक्रमे २ व ०.३ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस आदी फिचर्स असतील. यासोबत एयरटेलने १६९ रूपये महिन्याचा रिचार्ज सादर केला आहे. यात अमर्याद कॉलींगची सुविधा आहे. ग्राहकाला हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी २८९९ रूपये द्यावे लागतील. यानंतर त्याला तीन वर्षांसाठी १६९ रूपये प्रति-महिना इतके रिचार्ज करावे लागतील. यानंतर १८ महिन्यांनी त्याला ५०० तर ३६ महिन्यांनी १,००० रूपये असे एकंदरीत १५०० रूपये कॅशबॅकच्या स्वरूपात मिळतील. अर्थात हा स्मार्टफोन त्याला १,३९९ रूपयात मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here