एमएसएन आता हिंदीतही उपलब्ध

0

मायक्रोसॉफ्टने आपले एमएसएन.कॉम ही इन्फोटेनमेंट या प्रकारातील वेबसाईट आता हिंदीतदेखील सादर करण्याची घोषणा केली आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने १९९५ मध्ये आपल्या विंडोज ९५ ऑपरेटींग सिस्टीमसोबत एमएसएन या नावाने एक स्वतंत्र संकेतस्थळदेखील लाँच केले होते. पहिल्यांदा डायल-अप ऑनलाईन सर्व्हीस प्रोव्हायडरच्या स्वरूपात याला सादर करण्यात आले होते. नंतर याला एका व्यापक वेब पोर्टलमध्ये परिवर्तीत करण्यात आले. आजही हे संकेतस्थळ खूप लोकप्रिय असून याची जागतिक अलेक्झा रँक ५२ इतकी आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता हे संकेतस्थळ हिंदी भाषेतदेखील उपलब्ध करण्यात आलेले आहे. कुणीही युजर https://www.msn.com/hi-in या युआरएलवरून याला भेट देऊ शकतात. भारतात हिंदी युजर्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत. भारतीय भाषांमध्ये याचे प्रमाणे सुमारे ५० टक्के इतके आहे. या पार्श्‍वभूमिवर, हिंदी भाषिकांसाठी हे पोर्टल सादर करण्यात आले आहे. यात विविध विषयांवरील बातम्या, फिचर्स, लेख, सखोल विश्‍लेषण, इमेज गॅलरीज, व्हिडीओज आदी कंटेंट देण्यात आले आहे. यात मनोरंजन, खेळ, राजकारण, लाईफ स्टाईल, टेक, ऑटो, बिझनेस आदी विविध विषयांवरील फिचर्सचा समावेश असेल.

मायक्रोसॉफ्टने आपल्या एमएसएनला हिंदीत सादर करतांना अनेक विख्यात पब्लीशर्ससोबत करार केला आहे. यामध्ये भास्कर, जागरण, हिंदूस्तान, आज-तक, एनडीटिव्ही, बीबीसी हिंदी, मनी भास्कर व स्पोर्टस् किडा आदींचा समावेश आहे. यासोबत या संकेतस्थळावरून मायक्रोसॉफ्टच्या आऊटलुक, मायक्रोसॉफ्ट स्टोअर, स्काईप, ऑफीस, वननोट, वनड्राईव्ह व मॅप्स आदी सेवांसह फेसबुक व ट्विटरच्या थेट लिंक्स देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here