एनर्जायझरचा भारतीय बाजारपेठेत प्रवेश

0

इलेक्ट्रीकल आणि स्मार्टफोनच्या सुट्या भागाच्या उत्पादनातील आघाडीचे नाव असणार्‍या एनर्जायझर कंपनीने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.

एनर्जायझरने भारतात ३९९ ते २९९९ रूपयांच्या दरम्यान मूल्य असणारे विविध प्रॉडक्ट सादर केले आहेत. यात मायक्रो युएसबी केबल, युएसबी हब स्टेशन, युएसबी टाईप-सी केबल, कार किट, लाईटनिंग केबल आदींचा समावेश आहे. ही उत्पादने अमेझॉन इंडिया, स्नॅपडील, फ्लिपकार्ट व टाटाक्लिक आदी ई-कॉमर्स साईटवरून भारतीय ग्राहकांना १७ जुलैपासून खरेदी करता येतील. याशिवाय देशातल्या १५ प्रमुख शहरांमधील स्टोअर्समध्येही यांना उपलब्ध करण्यात आले आहे. तर पुढील टप्प्यात देशभरातल्या सर्व स्टोअर्समधून ही उत्पादने उपलब्ध करण्यात येणार असल्याचे या कंपनीने जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here