एचपी प्रो ८ टॅबलेट बाजारपेठेत दाखल

0

एचपी कंपनीने व्हाईस कॉलिंगची सुविधा असणारा एचपी प्रो ८ हा टॅबलेट भारतीय ग्राहकांना १९३७३ रूपये मूल्यात उपलब्ध केला आहे.

एचपी प्रो ८ हा टॅबलेट १२८० बाय ८०० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेच्या आयपीएस डिस्प्लेने सज्ज असेल. प्रखर सूर्य प्रकाशातही याच्या डिस्प्लेचा वापर शक्य आहे. यामध्ये ६४ बीट मीडियाटेक एमटी८७३५ प्रोसेसर आहे. या मॉडेलची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यातील बॅटरी ६,००० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. मायक्रो-युएसबीसह यात मायक्रो-एसडी कार्ड स्लॉट, हेडफोन जॅक असेल. वर नमूद केल्यानुसार यात व्हाईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. हा टॅबलेट ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स तसेच अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सने सज्ज असेल.

एचपी प्रो ८ हा टॅबलेट भारतीय युजर्सला आवश्यक असणार्‍या सर्व फिचर्सने सज्ज आहे. या मॉडेलमध्ये आयरिस आणि फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले असून ते आधारशी संलग्न असेल. याच्या मदतीने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ आणि याबाबतची माहिती मिळू शकते. याला बारकोड रीडर आणि प्रिंटर संलग्न करण्याची सुविधा दिलेली आहे. हा टॅबलेट एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १५ तासांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा टॅबलेट वॉटरप्रूफ आणि डस्ट रेझिस्टंट असेल. याशिवाय हा टॅबलेट २१ भारतीय भाषांच्या सपोर्टने सज्ज असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here