एचपी एलीटबुक मालिकेत तीन नवीन लॅपटॉप

0

एचपी कंपनीने आपल्या एलीटबुक ८०० या मालिकेत तीन नवीन लॅपटॉप भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

एचपी कंपनीने एलीटबुक मालिकेत ८३० जी५; ८४० जी५ आणि ८५० जी५ हे तीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत उतारले असून यांचे मूल्य अनुक्रमे ९७,०००; ९५,००० आणि ९७,००० रूपयांपासून सुरू होणारे आहे. यात इंटेलचे आठव्या पिढीतील कोअर आय७ हे अतिशय गतीमान असे प्रोसेसर देण्यात आले आहेत. तर यातील ८५० जी५ या मॉडेलमध्ये एएमडी आरएक्स५४० हा ग्राफीक प्रोसेससरही असेल. यातल्या ८३० जी५ आणि ८४० जी५ या मॉडेल्समध्ये ८ जीबीपर्यंत रॅम तर २५६ जीबीपर्यंत स्टोअरेजचे पर्याय देण्यात आले आहेत. तर ८५० जी५ मध्ये १६ जीबीपर्यंत रॅम आणि ५१२ जीबीपर्यंत स्टोअरेजचे पर्याय असतील. हे तिन्ही मॉडेल्स विंडोज १० प्रो या प्रणालीवर चालणारे आहेत.

एचपी कंपनीच्या या तिन्ही लॅपटॉपमध्ये अतिशय दर्जेदार बॅटरी असून ती तब्बल १५ तासांचा बॅकअप देत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. फिक्त ३० मिनिटांमध्ये ही बॅटरी ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. एलीट ८३० जी५; ८४० जी५ व ८५० जी५ या मॉडेल्समध्ये अनुक्रमे १३.३; १४ आणि १५.६ इंच आकारमानांचे आणि फुल एचडी क्षमतांचे डिस्प्ले प्रदान करण्यात आले आहेत. यात युएसबी ३.१, युएसबी २.०, थंडरबोल्ट, एचडीएमआय, मायक्रोफोन/हेडफोन जॅक आदी कनेक्टिव्हिटीचे पर्याय देण्यात आले आहेत. यात बँग अँड ओल्युफ्सेन या कंपनीचे दर्जेदार स्पीकर असून यातील मायक्रोफोनमध्ये नॉइस कॅन्सलेशनची सुविधा देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here