एचपीच्या एंट्री लेव्हल वर्कस्टेशन्सची मालिका

0

एचपीने आपल्या एंट्री लेव्हल वर्कस्टेशन्सची ‘झेड’ ही नवीन मालिका भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.

विविध प्रोफेशनल्स घरगुती संगणकापेक्षा वर्कस्टेशन्सला महत्व देतात. या माध्यमातून गतीमान पध्दतीतील फंक्शन्सचा वापर करता येत असतो. या अनुषंगाने प्रोफेशनल्ससाठी एचपी कंपनीने एंट्री लेव्हल अर्थात किफायतशीर दरातील वर्कस्टेशन्सची नवीन मालिका सादर केली आहे. ही मालिका ‘झेड’ या नावाने सुरू होणारी आहे. यामध्ये एचपी झेड२ मिनी जी४, एचपी झेड२ स्मॉल फॉर्म फॅक्टर (एसएफएफ)जी४, एचपी झेड२ टॉवर जी४ आणि एचपी एलीटडेस्क ८०० वर्कस्टेशन एडिशन आदी मॉडेल्सचा समावेश आहे.

यातील एचपी झेड२ मिनी जी४ हे जगातील सर्वात वेगवान असे लघु वर्कस्टेशन असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यामध्ये अतिशय गतीमान असा एएमडी राडीऑन प्रो डब्ल्यूएक्स४१५० हा ग्राफीक प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय विविध मॉडेल्समध्ये एनव्हडीटाचे क्वॉड्रो पी६००, क्वॉड्रो पी१००० आदी प्रोसेसर्स देण्यात आले आहेत. या सर्व मॉडेलसमध्ये एचपी कंपनीने एंड-टू-एंड या प्रकारातील सुरक्षा प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. यामुळे याला अतिशय ुरक्षितपणे वापरणे शक्य असल्याचे एचपीने नमूद केले आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here