एचटीसी यु ११ मॉडेलला मिळणार अँड्रॉइड ओरिओ अपडेट

0

एचटीसी कंपनीच्या एचटीसी यु ११ या फ्लॅगशीप मॉडेलला आता अँड्रॉइडच्या ओरिओ या अद्ययावत आवृत्तीचे अपडेट मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एसटीसीने अधिकृत घोषणा करत आपल्या एचटीसी यु ११ या मॉडेलला ओरिओचे अपडेट मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. पहिल्यांदा हे अपडेट तैवान देशातील युजर्सला मिळणार असून येत्या काही दिवसांमध्ये भारतासह अन्य देशांमधील स्मार्टफोनधारक याला वापरू शकणार आहे. हे अपडेट एकंदरीत १.३ जीबी इतक्या आकारमानाचे असेल. याला इन्स्टॉल केल्यानंतर युजर ओरिओ आवृत्तीतील सर्व फिचर्सचा वापर करू शकतो. यात पिक्चर इन पिक्चर, अ‍ॅडाप्टीव्ह आयकॉन्स, नवीन इमोजी आदींसह इतर फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

एचटीसी यु ११ हा स्मार्टफोन भारतात या वर्षीच्या जून महिन्यात लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना अमेझॉन इंडियावरून ५१,९९० रूपयात उपलब्ध करण्यात आला आहे. याची रॅम सहा जीबी रॅम तर इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने दोन टिबी इतके वाढवता येईल. यात ५.५ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी म्हणजेच ११४० बाय २५६० पिक्सल्स क्षमतेचा टचस्क्रीन डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण असेल. क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ६३५ या अत्यंत गतीमान प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलमध्ये १२ अल्ट्रा पिक्सल्स क्षमतेचा मुख्य तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. ३,००० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरी असणार्‍या या स्मार्टफोनमध्ये थ्री-डी साऊंड प्रणाली देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here