उत्तम बॅटरीयुक्त सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए ७.०

0

सॅमसंगने उत्तम दर्जाची बॅटरी असणारा आपला सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए ७.० हा टॅबलेट भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए ७.० हा टॅबलेट ९,५०० रूपये मूल्यात काळा आणि पांढरा या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना देशभरातील शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे. यासोबत कंपनीने काही ऑफर्सदेखील दिल्या आहेत. यात रिलायन्सच्या जिओचे २९९ रूपयांचे रिचार्ज करणार्‍या ग्राहकाला १२ महिन्यानंतर ८०० रूपये तर २४ महिन्यानंतर १२०० रूपये या दोन टप्प्यांमध्ये एकंदरीत २ हजारांचा कॅशबॅक मिळेल. मात्र यासाठी दरम्यानच्या कालखंडात युजरला दरमहा जिओचे रिचार्ज करावे लागेल.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए ७.० या मॉडेलमध्ये वर नमूद केल्यानुसार ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर ९ तासांचा व्हिडीओ प्ले-बॅक देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. सॅमसंग कंपनीच्या या टॅबलेटमध्ये ७ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा म्हणजेच १२८० बाय ८०० पिक्सल्सचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याची रॅम १.५ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते २०० जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी २ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा यात असेल.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए ७.० या मॉडेलमध्ये पेरेंटल कंट्रोल व किडस मोड हे विशेष फिचर्स दिले आहेत. यामुळे मुलांना सुरक्षितपणे हा टॅबलेट वापरता येईल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here