उत्तम बॅटरीयुक्त वायरलेस इयरफोन्स

0

जेयस या कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी ए-सिक्स हे वायरलेस इयरफोन्स सादर केले असून यात अतिशय दर्जेदार बॅटरी प्रदान करण्यात आली आहे.

जेयस या स्वीडीश कंपनीने ए-सिक्सच्या माध्यमातून भारतात पहिल्यांदाच वायरलेस इयरफोन्स सादर केले आहेत. यात अतिशय दर्जेदार बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १२ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. बहुतांश वायरलेस मॉडेल्समध्ये लवकरच डिसचार्ज होणारी बॅटरी असते. या पार्श्‍वभूमिवर, ए-सिक्स मॉडेलमधील बॅटरी हा या मॉडेलचा सेलींग पॉइंट ठरण्याची शक्यता आहे. नावातच नमूद असल्यानुसार हे इयरफोन्स वायरलेस पध्दतीने स्मार्टफोनसह अन्य उपकरणांशी ब्ल्यु-टुथ तंत्रज्ञानाच्या मदतीने कनेक्ट करता येतात. यात अतिशय उत्तम दर्जाचे स्पीकर देण्यात आले आहेत. याच्या मदतीने युजर्सला दर्जेदार श्रवणानुभूती घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तसेच यात संवेदनशील मायक्रोफोन इनबिल्ट अवस्थेत देण्यात आला असून याच्या मदतीने कॉल करणे अथवा रिसिव्ह करणे शक्य आहे. तसेच या मॉडेलमध्ये इन-लाईन कंट्रोल प्रणाली देण्यात आली असून याच्या मदतीने ध्वनीचा आवाज कमी-जास्त करणे तसेच म्युझिक ट्रॅक पुढे-मागे करणे वा पॉझ करणे आदी फंक्शन्स पार पाडता येतील. हे इयरफोन्स ग्राहकांना ५,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहेत. हेडफोन झोन्सच्या संकेतस्थळावरून याला कुणीही खरेदी करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here