उत्तम कॅमेर्‍यांनी सज्ज सेलकॉन युनीक स्मार्टफोन

0

सेलकॉन मोबाईल्स या कंपनीने सेलकॉन युनीक या मॉडेलला बाजारपेठेत उतारले असून यात अतिशय उत्तम दर्जाचे कॅमेरे देण्यात आले आहेत.

सेलकॉन युनीक या स्मार्टफोनमध्ये अतिशय उत्तम दर्जाचे कॅमेरे देण्यात आले आहेत. यात एलईडी फ्लॅशसह १६ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा दिलेला आहे. तर यातील ८ मेगापिक्सल्स क्षमतेच्या फ्रंट कॅमेर्‍यामध्ये मूनलाईट फ्लॅशची सुुविधा प्रदान करण्यात आली आहे. याच्या मदतीने कजी उजेड असतांनाही अतिशय उत्तम दर्जाच्या सेल्फी काढता येणार आहे. यात ५ इंच आकारमानाचा आणि एचडी रेझोल्युशन (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले असून यावर २.५ डी वक्राकार ग्लासचे आवरण असेल. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा आहे. यात २७०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. लवकरच हे मॉडेल ग्राहकांना देशभरातील शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे. सेलकॉन युनीक हा स्मार्टफोन ग्राहकांना ८,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here