ईपेलेटरच्या रेल्वे तिकिट सेवेला प्रतिसाद

0

निर्धारित कालावधीसाठी व्याजमुक्त क्रेडिट प्रदान करणार्‍या ईपेलेटर गेल्या ६ महिन्यांपासून आयआरसीटीसीवर आपली नाविन्यपूर्ण ‘बाय नाऊ, पे लेटर’ ही सुविधा देत असून याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.

ईपेलेटर कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या कालावधीदरम्यान शेवटच्या क्षणी तत्काळ बुकिंग करायची असो किंवा कौटुंबिक सुट्टीची योजना आखायची असो ’बाय नाऊ, पे लेटर’ सुविधेला लोकांनी अधिकाधिक पसंती दिली आहे. या संदर्भात सादर केलेल्या आकडेवारीनुसार तृतीय श्रेणी शहरांमधील भारतीय ग्राहकांनी स्लीपर क्लासला अधिक पसंती दिली आहे. स्लीपर क्लास तिकिट बुकिंग्जमधून महिना-दर-महिना प्रथम श्रेणी शहरांमधील ५५ टक्यांच्याा तुलनेत तृतीय श्रेणी शहरांमध्ये हे प्रमाण ६२ टक्के होते.

या संदर्भात ईपेलेटरच्या विपणन विभागाचे प्रमुख समीर भाटिया म्हणाले की, ‘ग्राहकांचा कल हा वन स्टॉप पेमेंट, सोयीस्कर वापर आणि स्थिर डिजिटल क्रेडिट सोल्यूटशनकडे असल्याने ईपेलेटरच्या सुविधेला ग्राहकांची वाढती पसंती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here