इन्स्टाग्राम स्टोरीज फेसबुकवर शेअर करण्याची सुविधा

0

इन्स्टाग्राम या अ‍ॅपवरील स्टोअरीज आता फेसबुकवरदेखील शेअर करता येणार आहे. आधी प्रायोगिक अवस्थेत असणारे हे फिचर आता सर्व युजर्सला देण्यात येणार आहे.

इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अ‍ॅपवरील स्टोरीज हे फिचर खूप लोकप्रिय झाले आहे. याच्या अंतर्गत कुणीही प्रतिमा वा व्हिडीओच्या स्वरूपातील स्टोरीज शेअर करू शकतो. २४ तासांपर्यंत ही स्टोरीज न्यूज फिडमध्ये दिसून नंतर गायब होते. हे फिचर खरं तर स्नॅपचॅट या लोकप्रिय अ‍ॅपची नक्कल आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात इन्स्टाग्राम अ‍ॅपवर स्टोरीज वापरण्याची सुविधा देण्यात आली होती. याला तुफान लोकप्रियता लाभली असून सध्या २५ कोटींपेक्षा युजर्स याचा वापर करत आहे. आता इन्स्टाग्राम स्टोरीजचा विस्तार होणार असल्याचे दिसून येत आहे. कारण आता कुणीही युजर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील स्टोरीज थेट आपल्या फेसबुक प्रोफाईलवर शेअर करू शकेल. गेल्या काही महिन्यांपासून या प्रकारच्या क्रॉस-शेअरिंगची चाचणी घेतली जात होती. आता मात्र हे फिचर प्रत्येक युजरला देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या माध्यमातून इन्स्टाग्राम आणि फेसबुक एकमेकांना कनेक्ट होण्याच्या दिशेने पाऊल पडणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here