इन्स्टाग्राम स्टोरीजवर टाईप मोड

0

इन्स्टाग्राम अ‍ॅपचे युजर्स आता शब्दांमध्येही स्टोरीज अपलोड करू शकणार आहेत. यासाठी या अ‍ॅपवर टाईप मोड प्रदान करण्यात आला आहे.

इन्स्टाग्राम या अ‍ॅपवर स्टोरीज हा प्रकार खूप लोकप्रिय झाला आहे. हे फिचर खरं तर स्नॅपचॅटवरून कॉपी करण्यात आले आहे. तथापि, आता स्नॅपचॅटपेक्षाही याला जास्त प्रमाणात वापरले जात आहे. या पार्श्‍वभूमिवर स्टोरीजला अधिकाधिक आकर्षक करण्याला इन्स्टाग्राम अ‍ॅपने सातत्याने प्राधान्य दिले आहे. या अनुषंगाने आता स्टोरीजवर टाईप मोड प्रदान करण्यात आला आहे. नावातच नमूद असल्यानुसार इन्स्टाग्राम अ‍ॅपचे युजर्स आता शब्दांमध्ये स्टोरीज अपलोड करू शकतील. आजवर कुणीही प्रतिमा अथवा व्हिडीओजच्या स्वरूपात स्टोरीज अपलोड करू शकत होते. यापुढे कुणीही शब्दांमध्ये स्टोरीजचा वापर करू शकतो. टाईप मोड हा इन्स्टाग्राम अ‍ॅपच्या खालील बाजूस नॉर्मल मोडच्या शेजारी देण्यात आला आहे. यात फाँट, फाँट आणि पार्श्‍वभागाचा रंग कस्टमाईज करण्याची सुविधा दिलेली आहे. प्रतिमा आणि व्हिडीओंप्रमाणे शब्दांमधील स्टोरीजही २४ तासांनी आपोआप गायब होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here