इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये क्वेश्‍चन स्टीकर फिचर

0
इन्स्टाग्राम,इन्स्टाग्रामच्या,instagram

इन्स्टाग्राम या लोकप्रिय अ‍ॅपने आपल्या स्टोरीज या फिचरमध्ये क्वेश्‍चन स्टीकर हे नवीन फिचर देण्यात आले असून यात युजर्सला प्रश्‍न विचारण्याची सुविधा मिळणार आहे.

इन्स्टाग्राम अ‍ॅपवर प्रश्‍न विचारण्याची सुविधा येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. आता हे फिचर युजर्सला क्रमाक्रमाने अपडेटच्या स्वरूपात देण्यात येत आहे. जगभरातील अँड्रॉइड व आयओएस प्रणालीचे युजर्स याला वापरू शकणार आहे. अर्थात यासाठी या अ‍ॅपची ताजी आवृत्ती असणे आवश्यक आहे. क्वेश्‍चन स्टीकर या फिचरचा नेमका वापर कसा करता येईल ? याची माहितीदेखील इन्स्टाग्रामने दिली आहे. यानुसार कुणीही युजर आपल्या स्टोरीजमध्ये क्वेश्‍चन स्टीकर वापरू शकतो. हे स्टिकर त्या युजरच्या स्टीकर गॅलरीत देण्यात आले आहे. यावर क्लिक केल्यावर त्याच्या समोर एक बॉक्स खुलतो. यात तो आपल्या फॉलोअर्सला प्रश्‍न विचारण्याचे आवाहन करू शकतो. याला स्टोरीजमध्ये समाविष्ट करून तो त्याच्या फॉलोअर्सला प्रश्‍न विचारण्यासाठी आमंत्रीत करू शकतो. यानंतर त्याचे फॉलोअर संबंधीत युजरला हवे ते प्रश्‍न विचारू शकतात. तर संबंधीत युजर या प्रश्‍नांची उत्तर देऊ शकतो. या सर्व प्रश्‍नोत्तरांचे नोटिफिकेशन्स तो युजर आणि त्याच्या फॉलोअर्सला मिळण्याची सुविधा यामध्ये देण्यात येत आहे.

इन्स्टाग्रामने आपल्या युजर्सची एंगेजमेंट वाढवण्यासाठी नवनवीन फिचर्स देण्याचा सपाटाच लावला आहे. यासाठी अतिशय लोकप्रिय ठरलेल्या स्टोरीज या फिचरवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. खरं तर हे फिचर स्नॅपचॅटवरून कॉपी करण्यात आले आहे. तथापि, आता स्नॅपचॅटपेक्षा इन्स्टाग्रामचे युजर्स याला मोठ्या संख्येने वापरत आहेत. काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामने आपल्या अ‍ॅपची लाईट आवृत्ती देखील सादर केली आहे. यामुळे संथ गतीचे अथवा विस्कळीत इंटरनेट असतांनाही इन्स्टाग्राम वापरता येणार आहे. यातच आता स्टोरीजची उपयुक्तता वाढविण्यात येणारे फिचर सादर केल्याची बाब लक्षणीय अशीच आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.