इन्स्टाग्राम युजर्सला मिळणार हे नवीन फिचर !

0
इन्स्टाग्राम,इन्स्टाग्रामच्या,instagram

इन्स्टाग्राम वापरणार्‍यांना आता ‘रेकमेंडेड फॉर यू’ या नावाने नवीन फिचर प्रदान करण्यात येत असून काही युजर्सला ते दिसू लागले आहे.

आपल्याला फेसबुकवर विविध प्रकारचे रेकमेंडेशन्स मिळत असतात. यात आपल्या आवडी-निवडी आणि फ्रेंड लिस्टवरून नवीन मित्र, पेजेस, ग्रुप्स आदींची माहिती दिली जाते. या माध्यमातून युजरचे एंगेजमेंट वाढविण्याचा प्रमुख हेतू असतो. आता याच पध्दतीचे रेकमेंडेशन्स इन्स्टाग्राम हे अ‍ॅप वापरणार्‍यांना मिळणार आहे. खरं तर काही युजरच्या माध्यमातून याची चाचणीदेखील सुरू झाली आहे. कोणत्याही युजरचे मित्र तसेच तो फॉलो करत असणार्‍या अकाऊंटचे अध्ययन करून त्याला ‘रेकमेंडेड फॉर यू’ या नावाने विविध पोस्ट दिसू लागल्या आहेत. या पोस्ट हाईड करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. इन्स्टाग्राम अ‍ॅपतर्फे याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी अनेक युजर्सला हे फिचर दिसू लागले आहे. टेकक्रंच या टेक पोर्टलने याबाबत दिलेल्या वृत्तात अँड्रॉइड आणि आयओएस या प्रणालीवरून इन्स्टाग्राम वापरणार्‍या सर्व युजर्सला येत्या काही दिवसांमध्ये याला प्रदान केले जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. इन्स्टाग्राम अ‍ॅपवर काही दिवसांपूर्वीच हॅशटॅग्जला फॉलो करण्याची सुविधा देण्यात आली आहे. या पाठोपाठ ‘रेकमेंडेड फॉर यू’ हे फिचर देण्यात येणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here