इन्स्टाग्राम प्रोफाईलचा कायापालट : जाणून घ्या सर्व बदल

0
इन्स्टाग्राम,इन्स्टाग्रामच्या,instagram

इन्स्टाग्राम अ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी नवीन प्रोफाईल डिझाईन सादर केली असून यात आधीपेक्षा काही नवीन बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

इन्स्टाग्राम युजर्सचे प्रोफाईल डिझाईन बदलण्यात येणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू होती. यावर आता कंपनीने अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले आहे. एका ब्लॉग पोस्टमधून या बदलाची माहिती देण्यात आलेली आहे. याच्या अंतर्गत इन्स्टाग्रामने युजर्सचे प्रोफाईल हे अधिक आकर्षक केल्याचे दिसून येत आहे. याच्या अंतर्गत आता प्रोफाईलवर ग्रीड, पोस्ट, आयजीटिव्ही आणि टॅग्ड आदी पर्याय देण्यात आले आहेत. तर फॉलो आणि मॅसेज आदींसाठीही स्वतंत्र आयकॉन प्रदान करण्यात आले आहेत. तर बिझनेस प्रोफाईल्ससाठी कॉल, ई-मेल, स्टार्ट ऑर्डर फ्रॉम धिस साईट आणि डायरेक्शन्स टू द बिझसेन आदी पर्यायदेखील असणार आहेत.

इन्स्टाग्राम अ‍ॅपच्या प्रोफाईलवरील बटन्सचे डिझाईन हे अधिक आकर्षक करण्यात आले आहे. तर एका विभागातून दुसर्‍यात जाण्यासाठीचे नेव्हिगेशनदेखील सुलभ केले आहे. हे बदल अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी करण्यात आलेले आहेत. येत्या काही आठवड्यांमध्ये सर्व युजर्सला हा बदल अपडेटच्या स्वरूपात मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here