इन्स्टाग्रामवर येणार ‘हे’ अभिनव फिचर

0
इन्स्टाग्राम,इन्स्टाग्रामच्या,instagram

इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अ‍ॅपने आता आपल्या युजर्ससाठी एक अत्यंत अभिनव फिचर सादर करण्याचे संकेत दिले आहेत.

इन्स्टाग्रामवर अलीकडच्या काळात अनेक नवीन फिचर्स प्रदान करण्यात येत आहेत. यात आता एका नवीन फिचरची भर पडणार आहे. याच्या अंतर्गत युजरला तो इन्स्टाग्रामवर नेमका किती वेळ व्यतीत करत आहे याची अचूक माहिती मिळणार आहे. विशेष करून कोणताही युजर इन्स्टाग्राम निरूद्देशपणे वापरत असेल. अर्थात तो टाईमपास करत असेल तर याची माहिती त्याला मिळणार आहे. यामध्ये त्याचा किती वेळ वाया जातोय याची माहिती अचूकपणे त्या युजरला सांगण्यात येणार आहे. अद्याप हे फिचर अधिकृतपणे लाँच करण्यात आलेले नसले तरी इन्स्टाग्रामच्या कोडमध्ये हे फिचर आढळून आले आहे. विशेष बाब म्हणजे इन्स्टाग्रामचा संस्थापक केव्हीन सिस्ट्रॉम याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे फिचर लवकरच येणार असल्याचे त्याने एका ट्विटच्या माध्यमातून नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here