इन्स्टाग्रामवर मिळणार स्क्रीनशॉट अलर्ट

0
इन्स्टाग्राम,इन्स्टाग्रामच्या,instagram

इन्स्टाग्राम अ‍ॅपच्या युजर्सला लवकरच स्क्रीनशॉट अलर्टची सुविधा मिळणार असून याची सध्या चाचणी सुरू करण्यात आली आहे.

इन्स्टाग्रामवर स्टोरीज हे फिचर खूप लोकप्रिय आहे. याच्या अंतर्गत कुणीही युजर आपल्या टाईमलाईनवर २४ तासांसाठी प्रतिमा वा व्हिडीओच्या स्वरूपात स्टोरीज अपलोड करू शकतो. अलीकडेच शब्दांमध्येही स्टोरीजची सुविधा देण्यात आली आहे. यातच आता एखाद्या युजरने दुसर्‍या युजरच्या स्टोरीजचा स्क्रीनशॉट काढल्याची माहिती त्याला अलर्टच्या स्वरूपात मिळणार आहे. या माध्यमातून युजरची एंगेजमेंट वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे मानले जात आहे. सध्या काही युजर्सच्या माध्यमातून या फिचर्सची चाचणी घेतली जात आहे. येत्या काही दिवसात हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीच्या युजर्ससाठी सादर करण्यात येईल असे वृत्त टेकक्रंच या टेक पोर्टलने दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here