इन्स्टाग्रामवरील शॉपींगचा विस्तार

0
इन्स्टाग्राम,इन्स्टाग्रामच्या,instagram

इन्स्टाग्रामने आपल्या प्रयोगात्मक अवस्थेत असणार्‍या शॉपेबल पोस्टचा विस्तार केल्यामुळे लवकरच या फोटो शेअरिंग अ‍ॅपवरून कोणत्याही प्रॉडक्टची थेट खरेदी करता येणार आहे.

इन्स्टाग्रामने गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात शॉपेबल पोस्ट या फिचरची चाचणी सुरू केली होती. याच्या अंतर्गत युजर्सला इन्स्टाग्रामवर विविध व्यावसायिक स्वरूपाच पोस्ट दर्शवत त्यावरून थेट खरेदीची चाचणी घेतली जात होती. इन्स्टाग्रामने आता आपल्या या फिचरचा विस्तार केला असून बिगकॉमर्स या संकेतस्थळाशी संलग्न केले आहे. यामुळे आता बिगकॉमर्सच्या तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रॉडक्टची ऑनलाईन विक्री करणारे सेलर्स इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आपापल्या उत्पादनांची थेट विक्री करू शकतील. तर अर्थातच इन्स्टाग्राम युजर्सला आपल्या न्यूज फिडमध्ये या पोस्ट दिसतील. तेथून ते आपल्याला हवे ते प्रॉडक्ट खरेदी करू शकतील. सध्या तरी बिगकॉमर्स संकेतस्थळाने आपल्या अमेरिकेतील सेलर्ससाठीच ही सुविधा दिली आहे. मात्र येत्या काही दिवसांमध्ये अन्य राष्ट्रांमध्येही हे फिचर देण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here