इन्स्टंट लोन देणार मोबीक्विक; ५ हजारांपर्यंत मिळणार कर्ज

0
मोबीक्विक इन्स्टंट लोन, mobikwik instant loan

मोबीक्विकने इन्स्टंट लोन देण्याची सुविधा जाहीर केली असून यात युजरला निकडीची गरज असतांना ५ हजार रूपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे.

भारतीय मोबाईल वॅलेटमध्ये सध्या तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळे ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी विविध कंपन्या नवनवीन युक्त्यांचा वापर करत आहेत. यात काही वॅलेटवरून ग्राहकांना इन्स्टंट लोन देण्याची सुविधा प्रदान केली आहे. मोबीक्विकनेही याच मार्गाचा अवलंब केल्याचे आता दिसून येत आहे. मोबीक्विकने ग्राहकांना फक्त १० सेकंदात कर्ज देण्याची घोषणा केली आहे. यात ग्राहकाला ५ हजारापर्यंतचे लोन मिळणार आहे. यासाठी मोबीक्विकने बजाज फिनसर्व्ह या वित्तीय कंपनीशी सहकार्याचा करार केला आहे. यासाठी एका वर्षाच्या आत तब्बल ३५०० कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे.

भारतात स्मार्टफोन वापरणार्‍यांच्या संख्येत दरवर्षी तब्बल १६ टक्क्यांनी वाढ होत आहे. तर ऑनलाईन व्यवहारांमध्ये प्रति-वर्ष ३० टक्क्यांनी वाढ होत आहे. यामुळे डिजीटल पेमेंट सिस्टीमला भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात संधी आहे. नेमका हाच विचार करून मोबीक्विकने आपला विस्तार करण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने इन्स्टंट लोनची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकाला फक्त तीन स्टेटची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. यानंतर त्याच्या मोबीक्विकच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा होणार आहे. या रकमेचा उपयोग ऑनलाईन/ऑफलाईन पेमेंट, विविध देयके, कॅब बील आदींसाठी करता येणार आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here