इन्फीनिक्सतर्फे हॉट ६ प्रो स्मार्टफोनची घोषणा

0
इन्फीनिक्स हॉट ६ प्रो , infinix hot 6 pro

इन्फीनिक्स कंपनीने हॉट ६ प्रो हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली असून यात किफायतशीर दरात उत्तमोत्तम फिचर्स आहेत.

इन्फीनिक्स कंपनीने काही दिवसांपूर्वीच एका टिझरच्या माध्यमातून नवीन स्मार्टफोनबाबत सूतोवाच केले होते. यामुळे हे मॉडेल नेमके कोणते असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. या अनुषंगाने आज हॉट ६ प्रो हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्यात आला. या स्मार्टफोनचे मूल्य ७,९९९ रूपये असून सँडस्टोन ब्लॅक, मॅजिक गोल्ड, सिटी ब्ल्यू आणि बॉरडेक्स रेड या रंगाच्या पर्यायांमध्ये याला फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आले आहे.

इन्फीनिक्सच्या हॉट ६ प्रो या मॉडेलमध्ये फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले ५.९९ इंच आकारमानाचा आणि १४४० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी प्लस या क्षमतेचा असणार आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅगड्रॅगन ४२५ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याच्या अंतर्गत १३ आणि २ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे दिलेले आहेत. यामध्ये ड्युअल एलईडी फ्लॅश, पोर्ट्रेट मोड, प्रोफेशनल मोड, टाईम लॅप्स, नाईट मोड, पॅनोरामा, एचडीआर आदी फिचर्स दिलेले आहेत. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. यामध्ये फेस अनलॉक हे फिचरदेखील देण्यात आले आहे.

इन्फीनिक्सच्या हॉट ६ प्रो या स्मार्टफोनमध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या एक्सओएस व्ही३.२ या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा आहे. दरम्यान, या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here