इंटेक्सचा ४३ इंची फोर-के स्मार्ट टिव्ही

0

इंटेक्स कंपनीने ४३ इंच आकारमानाचा आणि फोर-के क्षमता असणारा एलईडी बी४३०१ हा स्मार्ट टिव्ही भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

एलईडी बी४३०१ हा स्मार्ट टिव्ही ५२,९९० रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. शीर्षकात नमूद असल्यानुसार यात ४३ इंच आकारमानाचा आणि फोर-के म्हणजे अल्ट्रा हाय डेफिनेशन युएचडी क्षमतेचा (३८४० बाय २१६० पिक्सल्स) डिस्प्ले एलईडी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. क्वाड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलची रॅम २.५ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज आठ जीबी इतके असेल. हा स्मार्ट टिव्ही अँड्रॉइडच्या ५.१ या आवृत्तीवर चालणारा आहे. यात मीराकास्ट हे फिचर देण्यात आले असून याच्या मदतीने स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप आदी उपकरणे टिव्हीसोबत सुलभपणे जोडता येतील. अर्थात या उपकरणांवरील कंटेंट टिव्हीच्या डिस्प्लेवर पाहता येईल. हा स्मार्ट टिव्ही ब्ल्यू-टुथ आणि वाय-फाय कनेक्टीव्हिटीच्या पर्यायांसोबत ग्राहकांना मिळणार आहे. यात नॉइस रिडक्शन प्रणालीसह इनबिल्ट हाय-फाय ध्वनी प्रणाली देण्यात आली असून याच्या मदतीने उत्तम दर्जाची श्रवणानुभुती घेता येणार आहे.

इंटेक्सचा हा स्मार्ट टिव्ही अ‍ॅप स्टोअरसह येणार आहे. यावर युट्युब, नेटफ्लिक्स आदींसह विविध अँड्रॉइड अ‍ॅप सहजपणा वापरता येतील. तर भारतीय भाषांचा सपोर्ट असल्यामुळे हा टिव्ही वापरण्यात काहीही अडचणी येणार नसल्याचे कंपनीने म्हणणे आहे. यात दोन युएसबी, चार एचडीएमआय तर एक व्हिजीए पोर्ट असेल. यासोबत अतिशय दर्जेदार असा एयर माऊस रिमोट कंट्रोल देण्यात आला असून याच्या मदतीने या मॉडेलच्या विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करणे शक्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here