इंटरनेट ऑफ थिंग्जसाठी नवीन ऑपरेटींग प्रणाली

0

स्मार्टफोन्स आणि तत्सम उपकरणांसाठी असणार्‍या अँड्रॉईड या प्रणालीच्या यशानंतर आता गुगलने इंटरनेट ऑफ थिंग्जसाठी ब्रिलो ही ऑपटरेटींग सिस्टिम सादर करणार असल्याचे वृत्त आहे.

आगामी युग हे इंटरनेट ऑफ थिंग्ज अर्थात ‘आयओटी’चे राहणार आहे. अर्थात आपल्या भोवतीच्या बहुतांश वस्तू या ‘वाय फाय’च्या माध्यमातून एका वृहद नेटवर्कशी जोडल्या जाणार आहेत. आपली कार, घर, खुर्ची, फ्रिज, कपाट आदी उपकरणे यातून खर्‍या अर्थाने ‘स्मार्ट’ होणार आहेत. यातील काही वस्तू नेटवर्कशी जोडण्यात आलेल्या आहेत. यातील बहुतांश अँड्रॉईडवर चालणार्‍या आहेत. मात्र इंटरनेट ऑफ थिंग्जसाठी स्वतंत्र ऑपरेटींग सिस्टिम असावी असा कधीपासूनच प्रयत्न करण्यात येत आहे. या आठवड्याच्या प्रारंभीच हुवे या चिनी कंपनीने आपण ‘आयओटी’साठी स्वतंत्र ऑपरेटींग प्रणाली विकसित करत असल्याची घोषणा केली. या पार्श्‍वभुमिवर गुगलही स्वतंत्र प्रणाली सादर करण्याचे संकेत मिळाले आहेत.

पुढील आठवड्यात गुगलचे आय/ओ परिषद होत आहे. यात ही प्रणाली सादर होण्याची शक्यता आहे. याचे ‘ब्रिलो’ हे नाव असेल अशी माहिती लिक झाली आहे. ही नवीन प्रणाली अँड्रॉईडमधूनच विकसित करण्यात आली आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज मध्ये ‘लो पॉवर’ची उपकरणे राहणार आहेत. यामुळे ‘ब्रिलो’ ही प्रणाली अगदी ३२ वा ६४ एमबी इतकी कमी रॅम असणार्‍या उपकरणांसाठी तयार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here