बजाज कंपनीने आयएनएस विक्रांत या युध्दनौकेच्या धातूपासून तयार करण्यात आलेली आपली व्ही १५ ही नवीन दुचाकी भारतीय ग्राहकांना सादर केली आहे.
आयएनएस विक्रांत ही युध्दनौका अलीकडेच भंगारात काढण्यात आली. यातील खूप मोठा भाग विकत घेऊन बजाज कंपनीने यातील धातूपासून बाईक तयार करण्याचा निर्णय घोषित केला होता. व्ही १५ हे मॉडेल याच पध्दतीने तयार करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. यानुसार आता ही दुचाकी लॉंच करण्यात आली आहे. या बाईकच्या इंधनाच्या टाकीवर आयएनएस विक्रांतचा लोगोदेखील चिन्हीत करण्यात आला आहे. यात १५० सीसी क्षमतेचे सिंगल सिलींडर डिटीएस-आय इंजिन देण्यात आले आहे. यात पाच गिअर्स असतील. व्ही १५ ही बाईक पारंपरिक आणि स्पोर्टस या प्रकारातील मॉडेल्सचा संगम आहे. याचे दिल्लीतील एक्स-शोरूम मुल्य ६२,००० रूपये असेल. बजाज व्ही १५ या दुचाकीची अगावू नोंदणी सुरू झाली असून येत्या काही दिवसांमध्ये हे मॉडेल ग्राहकांना मिळणार आहे.
सुंदर माहीती देनारा दूत