आरएचए कंपनीचे वायरलेस इयरफोन्स

0
आरएचए वायरलेस इयरफोन्स,rha ma 360 wireless earphones

आरएचए या कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी आपल्या वायरलेस इयरफोन्सचे नवीन मॉडेल सादर करण्याची घोषणा केली असून हे ऑनलाईन पध्दतीमध्ये मिळणार आहे.

भारतीय ग्राहकांमध्ये वायरलेस इयरफोन्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे जगभरातील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी भारताकडे आपला मोर्चा वळविला आहे. या अनुषंगाने आरएचए या स्कॉटलंडमधील कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी आपले आरएचए एमए ३९० हे मॉडेल लाँच केले आहे. याचे मूल्य ५,९९९ रूपये असून हेडफोन्स झोन या संकेतस्थळावरून याला उपलब्ध करण्यात आले आहे. वास्तविक पाहता बाजारपेठेत अनेक मॉडेल्स अगदी किफायतशीर मूल्यात उपलब्ध असतांना या मॉडेलचे मूल्य तुलनेत थोडे अधिक आहे. अर्थात यात याच तोलामोलाचे काही फिचर्स आहेत. एक तर यामध्ये अतिशय आकर्षक व लवचीक अशी डिझाईन देण्यात आली आहे. नेकबँडच्या स्वरूपातील याची संरचना करण्यात आली आहे. याच्या दोन्ही इयरपीसमध्ये डायनॅमिक ड्रायव्हर प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये एसबीसी, एएसी आदींसह अलीकडच्या काळात लोकप्रिय झालेल्या क्वॉलकॉमच्या एपीटीएक्स एचडी या कोडेक्सचाही सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. यामुळे यात अतिशय उच्च दर्जाच्या ध्वनीची अनुभूती घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

आरएचए एमए ३९० या वायरलेस इयरफोन्समध्ये ब्ल्यु-टुथ कनेक्टीव्हिटी देण्यात आली आहे. याच्या मदतीने हे इयरफोन्स स्मार्टफोनसह अन्य उपकरणांना कनेक्ट करता येणार आहे. यातील वायरलेस रेंज ही १० मीटर असणार आहे. अर्थात या अंतराच्या आत असणार्‍या उपकरणांशी याला संलग्न करता येईल. यासाठी कंपनीने स्वतंत्र स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशनदेखील विकसित केले आहे. दरम्यान, यावर इन-लाईन या प्रकारातील नियंत्रण प्रणाली देण्यात आली आहे. याच्या मदतीने ध्वनीचा आवाज कमी/जास्त करणे, ट्रॅक बदलणे आदी शक्य आहे. यावरून संलग्न असणार्‍या स्मार्टफोनवरून कॉल करणे अथवा यावर आलेले कॉल रिसीव्ह करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. यात अतिशय दर्जेदार बॅटरी देण्यात आली असून ती युएसबी टाईप-सीच्या माध्यमातून चार्ज करता येईल. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे आठ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे याला आयपीएक्स ४ या मानांकनावर आधारित उत्पादीत करण्यात आले आहे. म्हणजेच हे वॉटरप्रूफ असल्यामुळे जीम, स्वीमिंग आदींमध्येही याला सहजपणे वापरता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here