आयबॉल स्लाईड पेनबुक : विंडोज १० वर चालणारे टु-इन-वन मॉडेल

0

आयबॉल कंपनीने भारतात आपले आयबॉल स्लाईड पेनबुक हे टु-इन-वन म्हणजेच लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारात वापरण्याजोगे मॉडेल लाँच केले असून ते विंडोज १० प्रणालीवर चालणारे आहे.

अलीकडच्या काळात बहुतांश कंपन्या टु-इन-वन मॉडेलला प्राधान्य देत आहेत. या अनुषंगाने आयबॉल स्लाईड पेनबुक हे मॉडेलदेखील याच प्रकारातील आहे. देशभरातील शॉपीजमधून हे मॉडेल ग्राहकांना २४,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. यासोबत एक स्टायलस पेनदेखील प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने कुणीही नोटस् घेणे, रेखाटन करणे आदी कामे करू शकेल. विशेष म्हणजे यात फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील देण्यात आले आहे. यात १.४४ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर इंटेल एक्स५-झेड८३५० प्रोसेसर प्रदान करण्यात आला असून यासोबत इंटेल एचडी ग्राफीक्स कार्डही असेल. या मॉडेलची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. या मॉडेलचा की-बोर्ड हा वेगळा करणे शक्य आहे.

आयबॉल स्लाईड पेनबुक र्माडेलमध्ये ६,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याच्या मागील बाजूस ५ तर समोर दोन मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा असेल. वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथसह यात मायक्रो-युएसबी, युसएबी २.०, युएसबी टाईप-सी पोर्ट व मायक्रो-एचडीएमआय पोर्ट प्रदान करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here