आयबॉल काँपबुक एक्झेम्पलेअर प्लस : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

आयबॉल या भारतीय कंपनीने किफायतशीर दर असणारा काँपबुक एक्झेम्पलेअर प्लस हा लॅपटॉप बाजारपेठेत उतारला आहे.

आयबॉल काँपबुक एक्झेम्पलेअर प्लस या मॉडेलमध्ये १४ इंच आकारमानाचा आणि एचडी (१३६६ बाय ७६८ पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले असेल. क्वॉड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने हे स्टोअरेज १२८ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. तर यात १ टेराबाईटपर्यंत हार्ड डिस्क ड्राईव्ह वापरण्यासाठी स्लॉटही देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी आयबॉल काँपबुक एक्झेम्पलेअर प्लस या मॉडेलमध्ये युएसबी, एचडीएमआय, मिनी एचडीएमआय, वाय-फाय, ब्ल्यु-टुथ आदी फिचर्स असतील.

आयबॉल काँपबुक एक्झेम्पलेअर प्लस हा लॅपटॉप विंडोज १० प्रणालीवर चालणारा असेल. यात १०,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यामुळे हा लॅपटॉप एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ८.५ तासांचा बॅकअप तर यातून १९ दिवसांचा स्टँडबाय टाईम मिळत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर यात अतिशय दर्जेदार असे ड्युअल स्पीकर असल्याने सुश्राव्य ध्वनीची अनुभूती घेता येते. याचा कि-बोर्ड हा चिकलेट स्टाईलचा असून विविध फंक्शन्ससाठी टचपॅड देण्यात आले आहे. हा लॅपटॉप ग्राहकांना १६,४९९ रूपये मूल्यात विविध शॉपींग पोर्टल्सवरून खरेदी करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here