आयबॉलचा स्लाईड मालिकेत नवीन टॅबलेट

0

आयबॉल कंपनीने आपल्या स्लाईड मालिकेत मध्यम किंमतपट्टयातील एक नवीन टॅबलेट भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.

आयबॉलने आजवर अत्यंत किफायतशीर मूल्यातील मॉडेल्स सादर केले आहेत. आता मात्र एलन स्लाईड ३एक्स३२ हा मिड रेंजमधील टॅबलेट बाजारपेठेत उतारण्यात आला आहे. याचे मूल्य १६,९९९ रूपये असून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये सादर करण्यात आले आहे.

स्लाईड मालिकेतील या नवीन टॅबलेटमध्ये अनेक उत्तम फिचर्स दिलेले आहेत. यातील लक्षवेधी फिचर म्हणजे तब्बल ७,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी होय. यामुळे दीघ काळापर्यंतचा बॅकअप मिळणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यातील दुसरी महत्वाची बाब म्हणजे यात फोर-जी व्हिओएलईटी नेटवर्कचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. यामुळे यावर व्हाईस कॉलींगसह गतीमान इंटरनेटचा वापर करता येणार आहे. अन्य कनेक्टीव्हिटींमध्ये वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, एचडीएमआय आदी पर्याय दिलेले आहेत.

स्लाईड मालिकेतील या टॅबलेटमध्ये १०.१ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १२८० बाय ८०० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले दिलेला आहे. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. एलईडी फ्लॅश आणि ऑटो-फोकसने सज्ज असणारा यातील मुख्य कॅमेरा ५ तर फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सल्सचा देण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here