आयबॉलचा अलेक्झा असिस्टंटयुक्त हेडफोन

0

आयबॉलने अलेक्झा या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटला इनबिल्ट अवस्थेत प्रदान केलेला ब्रीथ-एम हा हेडफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.

आता हेडफोनमध्ये अलेक्झा व गुगल असिस्टंटसारखे डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत देण्यात येत आहेत. आयबॉलने काही दिवसांपूर्वीच डेसिबल हा याच प्रकारातील हेडफोन सादर केला होता. यानंतर आता याच मार्गावरून जात ब्रीथ-एम हा हेडफोन लाँच करण्यात आला आहे. वर नमूद केल्यानुसार यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे यात अमेझॉनचा अलेक्झा हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत देण्यात आलेला आहे. यामुळे युजर आपल्या हेडफोनवरून व्हाईस कमांड अर्थात ध्वनी आज्ञावलीच्या माध्यमातून विविध फंक्शन्सचा वापर करू शकतो. यात तो अलेक्झाला आज्ञा देऊन संगीत, बातम्या, हवामानाचा अंदाज आदी बाबी ऐकू शकतो. तो अलेक्झाच्याच मदतीने कॉल करणे वा कॉल रिसिव्ह करणे या बाबी पार पाडू शकतो. अलेक्झा असिस्टंटचा वापर करण्यासाठी युजरला एमएफबी बटन दाबावे लागणार आहे. यानंतरच तो व्हाईस कमांडचा वापर करू शकतो.

ब्रीथ-एम हा हेडफोन वायरलेस या प्रकारातील आहे. अर्थात ब्ल्यु-टुथच्या मदतीने याला स्मार्टफोनसह अन्य स्मार्ट उपकरणांना कनेक्ट करता येणार आहे. तसेच यात ऑडिओ जॅकदेखील दिलेले असल्यामुळे याला वायर्ड हेडफोनच्या माध्यमातूनही वापरता येणार आहे. या हेडफोनसाठी आयबॉलने स्वतंत्र स्मार्टफोन अ‍ॅप हे अँड्रॉइड व आयओएस या प्रणालींसाठी सादर केले आहे. या मॉडेलच्या इयरकप्सवर अतिशय आकर्षक असे एलईडी लँप देण्यात आले आहेत. यामुळे श्रवणानुभूतीसोबत याचा लूकदेखील अतिशय आकर्षक वाटणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. हा हेडफोन ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीन २,२२५ रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here