आयफोनसाठी व्हाटसअ‍ॅपचा बीटा प्रोग्रॅम खुला

0

व्हाटसअ‍ॅपचा बीटा प्रोग्रॅम आता आयओएस प्रणालीसाठी लाँच करण्यात आला असून यामुळे आयफोनवरूनही याचा वापर करता येणार आहे.

व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरने आधीच अँड्रॉइड प्रणालीसाठी बीटा प्रोग्रॅम जाहीर केला आहे. याच्या अंतर्गत ही प्रणाली वापरणारा कुणीही युजर व्हाटसअ‍ॅपची बीटा अर्थात प्रयोगात्मक आवृत्ती सर्व युजर्सला सादर होण्याआधीच वापरू शकतो. अर्थात त्याला व्हाटसअ‍ॅपवरील तमाम नवीन फिचर्स हे सर्वात पहिल्यांदा वापरता येतात. तर प्रयोगात्मक आवृत्तीत त्रुटी दुरूस्त करणे सुलभ होत असल्यामुळे व्हाटसअ‍ॅपलाही याचा फायदा असतो. या प्रोग्रॅमला जगभरातून उदंड प्रतिसाद लाभला असून अनेक युजर्स याचा लाभ घेत आहेत. आपल्यालाही अँड्रॉइडच्या बीटा प्रोग्रॅममध्ये सहभागी व्हायचे असल्यास आपण येथे क्लिक करून याचा वापर करू शकतात. यानंतर हा प्रोग्रॅम विंडोज प्रणालीसाठीही उपलब्ध करण्यात आलेला आहे. या अनुषंगाने आयओएस सिस्टीमसाठी याला केव्हा उपलब्ध करण्यात येणार याबाबत प्रचंड औत्सुक्याचे वातावरण होते. मध्यंतरी निवडक डेव्हलपर्ससाठी याला सादर करण्यात आले होते. यानंतर आता याला आयओएस प्रणाली वापरणार्‍या सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. अर्थात आयफोन वापरणार्‍या युजर्सला व्हाटसअ‍ॅपच्या बीटा प्रोग्रॅममध्ये सहभागी होता येणार आहे.

आयफोन वा आयपॅडवरून व्हाटसअ‍ॅपची बीटा आवृत्ती वापरण्यासाठी खालील स्टेप्सचा वापर करा.

* अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरून व्हाटसअ‍ॅपची टेस्टफ्लाईट आवृत्ती डाऊनलोड करा.

* टेस्टफ्लाईट अगदी अचूकपणे इन्स्टॉल झाल्यानंतर येथे क्लिक करून सर्व स्टेप्सचे पालन करा.

* यानंतर आपण आयओएस प्रणालीसाठी बीटा आवृत्ती वापरू शकतात.

बीटा आवृत्तीचे अपडेट हे मूळ आवृत्तीपेक्षा तुलनेत लवकर येत असतात. व्हाटसअ‍ॅपने आयओएसच्या बीटा प्रोग्रॅमसाठी मर्यादीत स्लॉट उपलब्ध केले आहेत. यामुळे यासाठी आपण लवकरात लवकर प्रयत्न केल्यास उत्तम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here