आयपॅडला टक्कर देण्यासाठी सॅमसंग सज्ज

0

सॅमसंग कंपनी लवकरच गॅलेक्सी टॅब एस ४ हा नवीन टॅबलेट जागतिक बाजारपेठेत उतारणार असून या माध्यमातून आयपॅड प्रो या मॉडेलला तगडे आव्हान देण्याची तयारी करण्यात आली आहे.

अ‍ॅपलच्या आयपॅड प्रो या मॉडेलला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या पार्श्‍वभूमिवर, आयपॅडला टक्कर देण्यासाठी सॅमसंग कंपनीने कंबर कसल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने लवकरच सॅमसंग कंपनी गॅलेक्सी टॅब एस ४ या नावाने नवीन मॉडेल सादर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरं तर, या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्येच या मॉडेलचे अनावरण होणार असल्याचे संकेत मिळाले होते. तथापि, याऐवजी आता हा टॅबलेट बर्लीन शहरात होणार्‍या आयएफए-२०१८ या फेस्टमध्ये सादर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातच वाय-फाय अलायन्सच्या संकेतस्थळावर या मॉडेलचे रजीस्ट्रेशन करण्यात आले असून याच्या माध्यमातून याचे सर्व फिचर्स जगासमोर आले आहेत.

या लिस्टींगचा विचार केला असता, सॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस ४ या मॉडेलचे वाय-फाय आणि एलटीई असे दोन व्हेरियंट असतील. अर्थात यातील एक मॉडेलमध्ये फक्त वाय-फाय कनेक्टीव्हिटी असून दुसर्‍यात यासोबत सीमकार्ड वापरण्याची सुविधा दिलेली असेल. यात १०.५ इंच आकारमानाचा आणि २५६० बाय १६०० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८३५ हा प्रोसेसर दिलेला असेल. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा असेल. तसेच यातील मुख्य व फ्रंट कॅमेरा अनुक्रमे १२ व ८ मेगापिक्सल्सचा असण्याची शक्यता आहे. हा टॅबलेट अँड्रॉइडच्या ओरिओ या आवृत्तीवर चालणारा असल्याचे या लिस्टींगमध्ये नमूद करण्यात आले आहे. या मॉडेलचे अन्य फिचर्स आणि मूल्याबाबत मात्र यामध्ये काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here