आयडियाचा १५९ रूपयांचा नवीन प्रिपेड प्लॅन

0

आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी १५९ रूपयांचा नवीन प्लॅन सादर केला असून यात फोर-जी डाटासह कॉलींग व एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे.

सध्या टेलकॉम क्षेत्रात अतिशय चुरशीची स्पर्धा सुरू आहे. आयडिया आणि व्होडाफोनचा विलय झाल्यानंतर ही कंपनी देशातील पहिल्या क्रमांकाची कंपनी बनली असून त्यांनी अतिशय आक्रमकपणे विस्ताराची रणनिती आखल्याचे दिसून येत आहे. तर जिओ, एयरटेल आदी कंपन्यांनीही याला टक्कर देण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे एकमेकांवर मात करून ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी नवनवीन प्लॅन सादर करण्यात येत आहेत. यात आयडियाने १५९ रूपयांचा नवीन प्लॅन लाँच केला आहे. याची वैधता २८ दिवसांची असणार आहे. यात युजरला दररोज एक जीबी म्हणजे एकूण २८ जीबी फोर-जी डाटा वापरता येणार आहे. याशिवाय, ग्राहकाला स्थानिक, एसटीडी आणि रोमींगमध्ये कॉलींग करता येणार आहे. अन्य प्लॅननुसार यात अमर्याद कॉलींगची सुविधा देण्यात आलेली नाही. तर यात दररोज १०० मिनिट आणि आठवड्याला २५० मिनिट अशी मर्यादा घालण्यात आलेली आहे. तर यासोबत युजरला दररोज १०० एसएमएसदेखील वापरता येणार आहेत. पहिल्यांदा हा प्लॅन निवडक सर्कल्समध्ये लागू करण्यात आलेला असला तरी लवकरच देशभरात याला लागू करण्यात येणार आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here