आयकर खात्याची सोशल मीडियावर नजर

0

आयकर खात्याने आता प्रोजेक्ट इनसाईट ही अत्याधुनीक प्रणाली विकसित केली असून याच्या अंतर्गत नागरिकांच्या सोशल मीडियातील पोस्टच्या आधारे कर चोरी पकडली जाणार आहे.

भारतीय नागरिक कर चुकवेगिरीसाठी ख्यात आहेत. १३० कोटी लोकसंख्या असणार्‍या भारतात अवघे ३.७ कोटी लोक कर भरतात. गेल्या वर्षाचाच विचार केला असता उण्यापुर्‍या पावणेदोन लाख लोकांनीच आपले उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त दाखविलेले आहे. मात्र याच कालखंडात विकल्या गेलेल्या कार व महागड्या वस्तू तसेच परदेश यात्रांचे प्रमाण पाहिले असता बरेच जण आयकर खात्याला फसवी माहिती देत असल्याची बाब उघड आहे. या पार्श्‍वभूमिवर केंद्रीय प्राप्तीकर खात्याने प्रोजेक्ट इनसाईट ही खास प्रणाली विकसित केली आहे. यात माहितीचे विश्‍लेषण (डाटा अ‍ॅनलासिसीस), कृत्रीम बुध्दीमत्ता आदींचा वापर करण्यात आला आहे. याच्या मदतीने भारतीय नागरिकांच्या सोशल प्रोफाईलवर नजर ठेवत त्यातून त्यांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज लावत त्यांनी त्या प्रमाणात कर भरलेला आहे की नाही? याची माहिती मिळविण्यात येणार आहे. ब्रिटन, कॅनडा, बेल्जीयम आदी देशांमध्ये गेल्या काही वर्षांपासून याच पध्दतीने करदात्यांवर नजर ठेवली जात आहे. भारतातही ही प्रणाली यशस्वी होणार असल्याचा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. म्हणूनच प्रोजेक्ट इनसाईटसाठी केंद्र सरकारने जवळपास एक हजार कोटींचा खर्च केला आहे.

यामुळे आगामी काळात कुणी आपल्याकडी कारचे फेसबुक वा इन्टाग्रामवर छायाचित्र टाकले. अथवा परदेशातील सहलींचे व्हिडीओ टाकले तर त्यावर आयकर खात्याची नजर पडून आपल्याला त्यांच्याकडून नोटीस मिळू शकते. या संदर्भात प्राप्तीकर खात्यातर्फे कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी लवकरच ही प्रणाली लागू होण्याचे संकेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here