आधार प्रमाणित फिंगरप्रिंट स्कॅनरयुक्त टॅबलेट

0
आधार प्रमाणित टॅबलेट, aadhar, iball slide tablet

आधार प्रमाणित फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा असणारा टॅबलेट आयबॉल या कंपनीने सादर करण्याची घोषणा केली असून यामध्ये अनेक अन्य उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

कोणत्याही व्यक्तीला आधार क्रमांक प्रदान करण्याच्या प्रक्रियेत त्याचे फिंगरप्रिंट स्कॅनींगसह अन्य बायोमेट्रीक ऑथेंटीकेशन करण्यात येते. नेमक्या याच प्रणालीच्या आधारे फिंगरप्रिंट स्कॅनींगची सुविधा असणारा टॅबलेट आयबॉल कंपनीने आज भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे. ‘आयबॉल स्लाईड इंप्रिंट फोर-जी’ या नावाने हे मॉडेल ग्राहकांना १८,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. तर याचे इंटिग्रेटेड फिंगरप्रिंट स्कॅनरविना असणारे मॉडेलदेखील बाजारपेठेत सादर करण्यात आले असून याचे मूल्य ११,९९९ रूपये इतके असेल. यातील मुख्य मॉडेलमध्ये युजर फिंगरप्रिंट स्कॅन करून टॅबलेट अनलॉक करू शकणार आहे. हे करतांना त्या युजरचे आधार क्रमांक घेतांनाचे बोटाचे ठसे हेच होते का? याची खातरजमादेखील केली जाणार आहे. या माध्यमातून अतिशय सुरक्षित अशी अनलॉकींग प्रणाली प्रदान करण्यात येणार असल्याचा दावा आयबॉल कंपनीने केला आहे. या टॅबलेटवरून संबंधीत युजर हा आधार क्रमांकाची गरज असणार्‍या विविध सेवांचा एकाच उपकरणावरून लाभ घेऊ शकणार आहे. यात विविध सरकारी योजनांचा समावेश असणार आहे. सध्या विविध सेवांसाठी आधार अनिवार्य करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, आयबॉलचा हा टॅबलेट अतिशय उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. याच्या जोडीला या मॉडेलमध्ये २२ भारतीय भाषांचा सपोर्टदेखील देण्यात आलेला आहे. यामुळे भारतीय युजर्स याला अतिशय सुलभतेने हाताळू शकतील. यामध्ये अतिशय अचूक असे ‘आयरीस स्कॅनर’देखील देण्यात आले आहे.

आयबॉल स्लाईड इंप्रिंट फोर-जी या मॉडेलमध्ये ७ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा अर्थात १०२४ बाय ६०० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हा डिस्प्ले कपॅसिटीव्ह मल्टीटच या प्रकारातील सुविधेने सज्ज असेल. यामध्ये ६४ बीट क्वॉड-कोअर एआरएम कोर्टेक्स-ए५३ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम १ जीबी असून २ जीबी रॅमचा पर्यायदेखील उपलब्ध करण्यात आला आहे. तर यातील इनबिल्ट स्टोअरेजसाठी ८ व १६ जीबी असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. या दोन्ही व्हेरियंटमध्ये मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. तर यामध्ये ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ती मल्टी-टास्कींगसाठी उत्तम बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील देण्यात आले आहेत.

या आधार प्रमाणित टॅबलेटची बांधणी अतिशय दणकट अशी आहे. यामुळे याचा अगदी रफ वापरदेखील शक्य असल्याचे आयाबॉल कंपनीने नमूद केले आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here