आता स्मार्टफोनला असेल लाकडी आवरण

0

लवकरच लाकडी आवरण असणारे स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल होणार असून यासाठी अत्यंत टणक अशा सुपरवुडचा वापर केला जाणार आहे.

मेरीलँड विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या एका चमूने सुपरवुडच्या निर्मितीत यश मिळवले आहे. याच्या अंतर्गत नैसर्गीक लाकडातून लीग्नीन विलग केले जाते. यानंतर याला ६५ अंश सेल्सीयस तापमानावर एका प्रक्रियेच्या माध्यमातून कॉम्प्रेस केले जाते. यातून तयार झालेले लाकूड अगदी स्टील व टिटॅनियम अलॉयपेक्षाही मजबूत असते हे विशेष. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे सुपरवुड अन्य पर्यायांपेक्षा स्वस्त असल्यामुळे स्मार्टफोनचे आवरण म्हणून याचा वापर करता येणार आहे. सध्या उच्च श्रेणीतील म्हणजेच फ्लॅगशीप मॉडेल्समध्ये ग्लास वा मेटल तर अन्य किफायतशीर दरातल्या स्मार्टफोन्समध्ये सिरॅमिकचा वापर केलेला असतो. यातील धातूंचे आवरण असणारा स्मार्टफोन हा अतिशय मजबूत असतो. मात्र मेटलचे आवरण असणारा स्मार्टफोन हा वायरलेस चार्जींगला अवरोध निर्माण करत असतो. यामुळे स्मार्टफोनच्या अँटेनाच्या कार्यक्षमतेतही घट होत असते. सिरॅमिकच्या आवरणामुळे स्मार्टफोनला ओरखडे पडत नाहीत. तरी तो धातूइतका टिकावू नाहीय. तसेच हे आवरण तुटण्याची शक्यता असते. या सर्व बाबींचा विचार केला असता, लाकडी आवरण उपयुक्त ठरू शकते. या पार्श्‍वभूमिवर आता सुपरवुडचे आवरण असणारे स्मार्टफोन प्रचलीत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here