आता सीमकार्डयुक्त स्मार्ट स्पीकर

0
हुआवे स्मार्ट स्पीकर, huawei-ai-cube-smart-speaker

स्मार्ट स्पीकरची लोकप्रियता वाढत असतांना हुआवे कंपनीने फोर-जी नेटवर्कचा सपोर्ट असणार्‍या सीमकार्डने सज्ज असणारे मॉडेल सादर केले आहे.

जगभरात सध्या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटवर आधारित स्मार्ट स्पीकर लोकप्रिय होत आहेत. यात गुगल व अ‍ॅपलसह अनेक कंपन्यांनी नवनवीन मॉडेल्स सादर केले आहेत. यातील बहुतांश स्पीकर्समध्ये स्मार्टफोन संलग्न करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तथापि, हुआवे कंपनीने अलीकडेच अनावरण केलेल्या एआय क्युब या मॉडेलमध्ये यासोबत चक्क सीमकार्डचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. अर्थात या स्मार्ट स्पीकरमध्ये कुणीही सीमकार्ड टाकून याचा स्मार्टफोन म्हणून स्वतंत्र वापर करू शकतो. हे सीमकार्ड फोर-जी एलटीई नेटवर्कला सपोर्ट करणारे आहे. जगात पहिल्यांदा या प्रकारे सीमकार्डचा सपोर्ट असणारा स्मार्ट स्पीकर लाँच करण्यात आलाय हे विशेष ! यामुळे याला स्वतंत्र स्मार्टफोन म्हणूनही कॉल्स, मॅसेजेस आदींसाठी वापरता येणार आहे. याशिवाय, याचा वाय-फाय हॉटस्पॉट म्हणूनही उपयोग करता येईल. यावरून ३०० मेगाबाईट प्रति-सेकंद या गतीने डाटा ट्रान्सफर होणार असल्याचे हुआवे कंपनीने नमूद केले आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, एआय क्युब या स्मार्ट स्पीकर मॉडेलचा आकार लंबगोल या प्रकारचा आहे. याची उंची ८.६ इंच तर व्यास ४.५७ इंच इतका तर वजन ९०० ग्रॅम आहे. यात अमेझॉनच्या अलेक्झा या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. याच्या वरील बाजूस चार अतिशय संवेदनशील असे मायक्रोफोन देण्यात आलेले आहेत. यामुळे अगदी दूरवरूनही दिलेली व्हाईस कमांड ओळखून यावर कार्यान्वयन करता येत असल्याचा दावा हुआवे कंपनीने केला आहे. तर यातील स्पीकर हे खाली भागामध्ये देण्यात आलेले आहेत. यातून ३६० अंशातील अतिशय उच्च दर्जाच्या ध्वनीची अनुभूती घेता येत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यात अन्य स्मार्ट स्पीकर मॉडेलप्रमाणे युजरला व्हाईस कमांडच्या मदतीने विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करता येणार आहे. यात बातम्यांसह हवामानाचे अलर्ट, संगीत ऐकणे तसेच विविध नोटिफिकेशन्स व अन्य स्मार्ट उपकरणांच्या कनेक्टीव्हिटीचा समावेश आहे. हा स्पीकर पहिल्यांदा युरोपमध्ये लाँच करण्यात येणार असून नंतर याला भारतासह अन्य देशांमध्ये सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here