आता येणार पिक्सेल स्मार्टवॉच

0
पिक्सेल स्मार्टवॉचचे लीक झालेले छायाचित्र.

गुगलतर्फे लवकरच पिक्सेल स्मार्टवॉच सादर करण्यात येणार असून हे मॉडेल याच कंपनीच्या वेअरओएस या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारे असतील.

गुगलने आपल्या नुकत्याच झालेल्या आय/ओ परिषदेत आपल्या आगामी वाटचालीचे संकेत देणार्‍या विविध घोषणा केल्या. यात ही कंपनी विद्यमान टुल्समध्ये नवीन फिचर्सचा समावेश करणार असून आगामी वाटचालीत हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही प्रकारांवर सारख्याच प्रमाणात भर देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अनुषंगाने ही कंपनी लवकरच पिक्सेल स्मार्टवॉच सादर करणार असल्याची माहिती विविध लिक्सच्या माध्यमातून समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे गुगलने आपल्या अँड्रॉइड वेअर या प्रणालीचे वेअरओएस असे नवीन नामकरण केले आहे. याच प्रणालीवर पिक्सेल स्मार्टवॉच चालणारे असेल.

वेअरेबल्स म्हणजेच परिधान करण्यायोग्य उपकरणांच्या क्षेत्रात प्रचंड तेजीचे संकेत आहेत. येत्या कालखंडात वेअरेबल्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची चुणूक आतापासूनच मिळू लागली आहे. या पार्श्‍वभूमिवर, पिक्सेल स्मार्टवॉचच्या माध्यमातून गुगल या क्षेत्रात दमदार पदार्पण करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यात गुगल असिस्टंट हा इनबिल्ट अवस्थेत देण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यात गुगल आपले पिक्सेल ३ आणि पिक्सेल ३ एक्सएल हे फ्लॅगशीप स्मार्टफोन्स लाँच करणार असून याच्याच सोबत पिक्सेल स्मार्टवॉच सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here