आता ब्ल्यु-टुथ स्पीकर व एलईडी लाईटयुक्त पंखा !

0
ब्ल्यु-टुथ स्पीकरयुक्त पंखा, fanzart melody fan with bluetooth

सिलींग फॅनमध्येच ब्ल्यु-टुथ स्पीकर व एलईडी लाईटची सुविधा असणारे मॉडेल फॅनझार्ट या कंपनीने बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

सध्या प्रत्येक उपकरण्याची उपयुक्तता अर्थात युटिलिटी वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे एकाच उपकरणात जास्तीत जास्त सुविधा देण्याकडे बहुतांश कंपन्यांचा कल वाढला आहे. या अनुषंगाने फॅनझार्ट या कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी मेलोडी या नावाने अनोखा डिझायनर फॅन सादर केला आहे. यामध्ये पंख्यासोबत ब्ल्यु-टुथ स्पीकर व एलईडी लाईटदेखील प्रदान करण्यात आले आहेत. वरकरणी पाहता हे मॉडेल पारंपरीक फॅनप्रमाणेच दिसते. मात्र यात नाविन्यपूर्ण फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

मेलडीचा पहिला आणि महत्वाचा वापर हा सिलींग फॅन म्हणून करता येणार आहे. अन्य पंख्यांपेक्षा याची डिझाईन ही अधिक स्मार्ट पध्दतीत केल्याचे दिसून येत आहे. यामुळे पारंपरीक मॉडेलपेक्षा हे थोडे वेगळे दिसणारे आहे. यातील नाविन्यपूर्ण डिझाईनमुळे अन्य फॅन्सच्या तुलनेत हे मॉडेल तब्बल तीन पटीने अधिक प्रमाणात हवा फेकत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यासाठी यात ३८ इंच आकारमानाचे चार पाते प्रदान करण्यात आले आहेत.

यात वर नमूद केल्यानुसार ब्ल्यु-टुथ कनेक्टीव्हिटी असणारा स्पीकर इनबिल्ट अवस्थेत देण्यात आला आहे. याला स्मार्टफोन तसेच अन्य उपकरणांशी कनेक्ट करता येणार आहे. याची क्षमता १० वॅटची असून यामुळे यातून एखाद्या मोठ्या हॉलसाठी आवश्यक असणार्‍या ध्वनीची निर्मिती होत असते. याच्या मदतीने कोणत्याही संगीताचा अतिशय दर्जेदार पध्दतीत आनंद घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर याच स्पीकरच्या भोवती गोलाकार आकारात १२ वॅट क्षमता असणारा एलईडी लाईटदेखील देण्यात आला आहे. यामुळे फॅनसोबत ब्ल्यु-टुथ स्पीकर आणि एलईडी लाईटचा वापर करता येणार आहे.

या मॉडेलसोबत अतिशय परिणामकारक असे इन्फ्रारेड रिमोट कंट्रोलदेखील देण्यात आले आहे. याचा वापर करून फॅन, ब्ल्यु-टुथ स्पीकर आणि एलईडी लाईट यांचा स्वतंत्र अथवा एकत्रीत वापर करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व फंक्शन्स देण्यात आले आहेत. फॅनझार्टचा मेलोडी हा स्मार्ट फॅन २९,९९० रूपये मूल्यात अमेझॉन इंडियासह कंपनीच्या स्टोअरवरून खरेदी करता येणार आहे.

पहा :- फॅनझार्टची कार्यप्रणाली दर्शविणारा व्हिडीओ.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here