आता तब्बल १ टेराबाईट स्टोअरेजचा स्मार्टफोन

0

आजवर २५६ जीबीपेक्षा जास्त स्टोअरेजचा स्मार्टफोन बाजारपेठेत उपलब्ध नसतांना स्मार्टीसन या कंपनीने तब्बल एक टेराबाईट इनबिल्ट स्टोअरेज असणारे मॉडेल लाँच करून धमाल उडवून दिली आहे.

सध्या अनेक फ्लॅगशीप अर्थात उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्समध्ये २५६ जीबी इनबिल्ट स्टोअरेज आहे. मध्यंतरी हुआवे कंपनी ५१२ जीबी स्टोअरेजयुक्त स्मार्टफोन सादर करणार असल्याची चर्चा होती. तथापि, अद्यापही हे मॉडेल बाजारात उतारण्यात आलेले नाही. मात्र स्मार्टीसन या चीनी कंपनीने कोणताही सुगावा लागू न देता तब्बल १ टेराबाईट स्टोअरेजचा स्मार्टफोन लाँच करून जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

या कंपनीने स्मार्टीसन आय १ हा स्मार्टफोन बाजारपेठेत लाँच केला आहे. यात अतिशय दर्जेदार फिचर्स आहेत. मात्र सर्वात लक्षवेधी बाब अर्थातच एक टेराबाईट स्टोअरेज हे आहे. या मॉडेलची रॅम ६ व ८ जीबी असून स्टोअरेजसाठी १२८ जीबी, आणि १ टिबी असे पर्याय देण्यात आलेले आहेत. यातील १ टिबी क्षमतेच्या भारतीय चलनातील मूल्य भारतीय चलनानुसार सुमारे ९४ हजार रूपये आहे. उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, यामध्ये ६.१७ इंच आकारमान असणारा नॉचयुक्त फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस १२ आणि २० मेगापिक्सल्सचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात २४ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. यात क्वॉलकॉमच्या क्विकचार्ज ४ प्लस या तंत्रज्ञानाने युक्त असणारी ३,६०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here