आता ट्विचचे डेस्कटॉप अ‍ॅप

0

ट्विच या ऑनलाईन गेमिंग व स्ट्रीमिंगमध्ये आघाडीवर असणार्‍या कंपनीने आता डेस्कटॉप अ‍ॅप सादर करण्याची घोषणा केली आहे.

ट्विट अ‍ॅपच्या माध्यमातून आपण ऑनलाईन गेमिंगसह याचे स्ट्रीमिंग करू शकतो. तर अन्य गेमर्सचे स्ट्रीमिंगदेखील पाहू शकतो. २०११ साली सुरू झालेली ही सेवे अमेझॉन कंपनीच्या मालकीची आहे. सुमारे दोन महिन्यांपुर्वी ट्विचने आपले डेस्कटॉप अ‍ॅप प्रयोगात्मक म्हणजेच बीटा अवस्थेत युजर्सला सादर केले होते. आता हे अ‍ॅप जगातील सर्व युजर्ससाठी खुले करण्यात आले आहे. अर्थात यामुळे संगणकावरूनही ट्विचचा आनंद घेता येणार आहे. हे अ‍ॅप वापरून व्हिडीओ आणि ऑडिओ चॅटदेखील करता येईल. विशेष करून यावरील व्हिडीओ चॅटींगचे फिचर भन्नाट आहे. यात एका वेळी पाच युजर्स एकमेकांशी संवाद साधू शकतील. यावर लवकरच क्लाऊड स्टोअरेजची सुविधादेखील प्रदान करण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या डेस्कटॉप अ‍ॅपवर डार्क मोड प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने डिस्प्लेच्या प्रकाशाची तीव्रता अ‍ॅडजस्ट करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here