आता चक्क टी आकाराचे एलईडी बल्ब

1

फिलीप्स कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी टी आकाराचे एलईडी बल्ब सादर केले असून ते कमी उर्जेत अधिक प्रकाश देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

फिलीप्स टी बल्बची सर्वात लक्षणीय बाब म्हणजे याचा आकार इंग्रजी टी या अक्षराप्रमाणे आहे. आजवर आपण गोल, लंबगोल, आयत, चौरस, स्पायरल आदी आकारांचे लाईट पाहिले असतील. मात्र फिलीप्सने पहिल्यांदा टी आकाराचा बल्ब सादर केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. या आकारामुळे जास्त क्षेत्रफळाच्या आकारमानात बल्बचा प्रकाश पोहचू शकणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. अर्थात याचा आकार थोडा विचीत्र असला तरी विद्यमान एलईडी लाईटप्रमाणे हेदेखील कोणत्याही बल्ब सॉकेटमध्ये अतिशय सुलभ पध्दतीने लावता येणार आहे. हे बल्ब ८ वॅट आणि १० वॅट क्षमतेच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले असून याचे मूल्य २९९ रूपयांपासून सुरू होणारे आहे.

1 COMMENT

  1. You are doing a great job sir but it’d be great if you could provide more scientific information that news.
    We already get info about Watts and shape of bulb from advertisement.
    What we’d like to know is how is it better than regular bulb or is it just new trend.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here