अ‍ॅमेझॉनच्या सहेली उपक्रमाचा विस्तार

0

अमेझॉनने आपल्या सहेली या उपक्रमाचा विस्तार करत माण देशी फाऊंडेशन आणि सीओडब्ल्यूई म्हणजेच महिला उद्योग महासंघाशी सहकार्याचा करार केला आहे.

महिला उद्योजकांच्या मदतीसाठी विकसित करणार्‍या आलेल्या सहेली या आपल्या उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी अ‍ॅमेझॉन इंडियाने माण देशी फाउंडेशन आणि सीओडब्ल्यूई (महिला उद्योजक महासंघ) यांच्याशी भागीदारी करत असल्याची घोषणा केली. या नामांकित संस्थांशी जोडलेल्या महिला उद्योजकांच्या सबलीकरणासाठी या महिलांना ‘अमेझॉन इंडिया’वर आपली उत्पादने विकण्यास पाठबळ पुरविले जाणार आहे. या भागीदारीमधून देशभरातील ६२,००० हून अधिक महिला उद्योजकांच्या आयुष्यांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे लक्ष्य अ‍ॅमेझॉन इंडियाने डोळ्यांसमोर ठेवले आहे. याच हेतूने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा उपक्रम सुरू झाल्यापासून आजतागायत याची पोहच तिपटीने वृध्दींगत करण्यात आली आहे. या भागीदारीच्या माध्यमातून माण देशी फाउंडेशन आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या महिला उद्योजकांना ‘द सहेली स्टोअर’ या खास उद्योजिकांना वाहिलेल्या विभागातून आपली उत्पादने ऑनलाईन विक्रीसाठी ठेवता येणार आहेत. कपडे, खाद्यपदार्थ, घरगुती आणि स्वयंपाकघरातील वस्तू इत्यादी स्थानिक पातळीवर बनविलेल्या खास वस्तू सहेली स्टोअरमध्ये विक्रीस ठेवण्याची संधी या महिला उद्योजकांना मिळणार आहे. यासाठी त्यांनी प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

१९९६ साली स्थापन झालेले माण देशी फाउंडेशन हे महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यांच्या ग्रामीण भागातील महिला उद्योजकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ज्ञान, कौशल्य, धैर्य, बाजारपेठांशी संपर्क आणि भांडवल या माध्यमांतून त्यांचे जगणे संवर्धित करण्याचे व अशा उद्योजिकांना पाठबळ देण्याचे काम करते. तर गेली बारा वर्षे महिला उद्योजकांना पाठिंबा देण्याचे काम करणारे सीओडब्ल्यूई हे प्रशिक्षण, मार्गदर्शन, निर्मिती, मार्केटिंग आणि संपर्कजाळे उभारण्यासाठीच्या मंचांद्वारे आपल्या सदस्यांची मदत करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here