अ‍ॅपल वीकमध्ये सवलतींचा वर्षाव

0

फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवर सध्या अ‍ॅपल वीक सुरू असून यात अ‍ॅपल कंपनीच्या विविध उत्पादनांवर सवलती देण्यात आल्या असून यात कॅशबॅक ऑफर्सचाही समावेश आहे.

फ्लिपकार्ट पोर्टलवर अ‍ॅपल वीक सुरू झाला असून तो १५ जानेवारीपर्यंत चालणार आहे. यात आयफोनचे विविध व्हेरियंट, मॅकबुक एयर, आयपॅड, आयपॅड प्रो, अ‍ॅपल वॉच आदी विविध उत्पादने सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आले आहेत. यात अ‍ॅपल कंपनीचा आयफोन ७ प्लस (३२ जीबी) हे मॉडेल ५६,९९ रूपयात मिळत आहेत. या स्मार्टफोनचे मूळ मूल्य ५९,०० रूपये आहे. आयफोन ६एस प्लस या मॉडेलवर सुमारे ११ हजारांची सवलत मिळत असून हा स्मार्टफोन ३७,९९९ रूपयात उपलब्ध करण्यात आले आहे. आयफोन ७ (३२ जीबी) याच्या मूल्यात सुमारे सहा हजारांची कपात करण्यात आली असून हे मॉडेल ४२,९९९ रूपयात मिळत आहे. २९,५५० रूपयात मिळणारा आयफोन ६ (३२ जीबी) हा स्मार्टफोन अ‍ॅपल वीकमध्ये २५,४९९ रूपयात तर २६,००० मूल्य असणारा आयफोन एसई (३२ जीबी) १८९९९ रूपयात मिळत आहे. प्रिमीयम मॉडेल्सचा विचार केला असता, ६४,००० रूपये मूल्य असणारा आयफोन ८ (६४ जीबी) हा स्मार्टफोन ५४,९९९ रूपयात मिळत आहे. तसेच आयफोन ८ प्लस (६४ जीबी) हे मॉडेल ६६,४९९ रूपयात मिळत असून याचे मूळ मूल्य ७,३००० रूपये इतके आहे.

अ‍ॅपल वीकमध्ये अनेक मॉडेल्सवर कॅशबॅक देण्यात येत आहे. यात आयफोन ८, आयफोन ८ प्लस आणि आयफोन एक्स या मॉडेल्सवर ८ हजारांचा कॅशबॅक मिळत आहे. आयफोन ७ आणि ७ प्लस या मॉडेल्सवर ३ हजारांचा कॅशबॅक देण्यात येत आहे. तर आयफोन एसईवर २५०० हजारांचा कॅशबॅक देण्यात येत आहे. अर्थात आयसीआयसीआय क्रेडीट कार्डवरून इएमआयच्या माध्यमातून वरील प्रॉडक्ट खरेदी करणारांनाच या कॅशबॅक योजनेचा लाभ मिळणार आहे.

अ‍ॅपल वीकमध्ये आयपॅड (वाय-फाय ओन्ली ३२ जीबी) हे दोन हजारांनी स्वस्त म्हणजेच २२,९०० रूपयांत मिळत आहे. यावर २५०० रूपयांच्या कॅशबॅकची ऑफरही आहे. आयपॅड प्रो मॉडेलच्या १०.५ आणि १२.९ इंच आकारमानाच्या मॉडेल्सवरही २५०० रूपयांचा कॅशबॅक देण्यात येत आहे. अ‍ॅपल वॉच सेरीज १चे मूल्य १८,९९०; अ‍ॅपल वॉच सेरीज २ चे मूल्य २२,९०० तर अ‍ॅपल वॉच सेरीज ३ चे मूल्य २९,९०० रूपयांपासून सुरू होणार आहे. यावरही २५०० रूपयांच्या कॅशबॅकची ऑफर देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here