अ‍ॅपल आयपॅडची फ्लिपकार्टवर लिस्टींग

0

अ‍ॅपल कंपनीने अलीकडेच जाहीर केलेल्या आपल्या आयपॅडच्या नवीन आवृत्तीला भारतीय बाजारपेठेत फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध केले असून याची लिस्टींगदेखील करण्यात आली आहे.

अ‍ॅपल कंपनीने काही दिवसांपूर्वीच नवीन ९.७ इंच आकारमानाचा आयपॅड सादर केला होता. आता हे मॉडेल फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आले असून ग्राहकांना ते २० एप्रिलपासून खरेदी करता येणार आहे. सिल्व्हर, स्पेस ग्रे आणि गोल्ड या रंगांमधील याचे ३२ जीबी स्टोअरेज असणारे आणि फक्त वाय-फाय कनेक्टीव्हिटी असणारे मॉडेल २८,००० रूपयात मिळणार आहे. तर ३२ जीबी स्टोअरेजचेच आणि वाय-फाय सोबत सेल्युलर कनेक्टीव्हिटी असणारे मॉडेल ३८,६०० रूपयात मिळेल. अ‍ॅपल पेन्सीलचे मूल्य ७६०० रूपये आहे. अ‍ॅपल आयपॅडमध्ये अ‍ॅपल पेन्सील हा स्टायलस पेन वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. याच्या मदतीने रेखाटन करता येत असल्याने विद्यार्थी विविध प्रकारचे स्केच काढू शकतात. याशिवाय याच्या मदतीने डिस्प्लेवर लिहतादेखील येते. सुलभपणे नोटस् काढण्यासाठी याचा वापर करता येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. यात ९.७ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच २०४८ बाय १५३६ पिक्सल्स क्षमतेचा मल्टीटच आयपीएस रेटीना डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ओलीओफोबीक कोटींग देण्यात आलेली असून यामुळे याचा टचस्क्रीन डिस्प्ले अनेकदा वापरूनही खराब होत नाही. यामध्ये ६४ बीट ए१० फ्युजन हा प्रोसेसर असून याला एम१० या अन्य प्रोसेसरची जोड देण्यात आली आहे.

नवीन आयपॅड मॉडेलमध्ये ऑटो-फोकस प्रणाली, एफ/२.४ अपार्चर आणि ५ एलिमेंट लेन्सयुक्त ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या मदतीने फुल एचडी क्षमतेच्या व्हिडीओचे चित्रीकरण शक्य आहे. याशिवाय यात १२० फ्रेम्स प्रति-सेकंद इतक्या गतीचे स्लो-मोशन चित्रीकरण, स्टॅबिलायझेशन युक्त टाईम लॅप्स चित्रीकरण, ३ एक्स व्हिडीओ झूम, जिओ-टॅगींग, लाईव्ह फोटोज, पॅनोरामा, एचडीआर, बॉडी अँड फेस डिटेक्शन, बर्स्ट मोड, लाईव्ह फोटोज आदी फिचर्स दिलेले आहेत. ते सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये १.२ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात एफ/२.२ अपार्चर असून हा कॅमेरा एचडी रेकॉर्डींग करण्यास सक्षम आहे. नवीन आयपॅडमध्ये अ‍ॅपल कंपनीचा सिरी हा व्हाईस कमांडवर चालणारा डिजीटल असिस्टंट देण्यात आला आहे. यामध्ये ३२.४ वॅट क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर १० तासांचा बॅकअप देते. हा आयपॅड आयओएस ११ या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा असून यात हिंदी भाषेचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅन, ब्ल्यु-टुथ आदी फिचर्स आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here