अ‍ॅपलचा किफायतशीर नवीन आयपॅड

0

अ‍ॅपलने कंपनीने किफायतशीर दर असणारा नवीन ९.७ इंची आयपॅड हा टॅबलेट बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

नवीन आयपॅड मॉडेलमध्ये ९.७ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच २०४८ बाय १५३६ पिक्सल्स क्षमतेचा मल्टीटच आयपीएस रेटीना डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये ६४ बीट ए१० फ्युजन हा प्रोसेसर असून याला एम१० या अन्य प्रोसेसरची जोड देण्यात आली आहे. यामध्ये आयपॅड प्रो या मॉडेलप्रमाणेच अ‍ॅपल पेन्सील हा स्टायलस पेन वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. याच्या मदतीने रेखाटन करता येत असल्याने विद्यार्थी विविध प्रकारचे स्केच काढू शकतात. याशिवाय याच्या मदतीने डिस्प्लेवर लिहतादेखील येते. सुलभपणे नोटस् काढण्यासाठी याचा वापर करता येतो. नवीन आयपॅड मॉडेलमध्ये ऑटो-फोकस प्रणाली, एफ/२.४ अपार्चर आणि ५ एलिमेंट लेन्सयुक्त ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या मदतीने फुल एचडी क्षमतेच्या व्हिडीओचे चित्रीकरण करता येणार आहे. तसेच यात १२० फ्रेम्स प्रति-सेकंद इतक्या गतीचे स्लो-मोशन चित्रीकरण, स्टॅबिलायझेशन युक्त टाईम लॅप्स चित्रीकरण, ३ एक्स व्हिडीओ झूम, जिओ-टॅगींग, लाईव्ह फोटोज, पॅनोरामा, एचडीआर, बॉडी अँड फेस डिटेक्शन, बर्स्ट मोड, लाईव्ह फोटोज आदी फिचर्स दिलेले आहेत. ते सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये १.२ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात एफ/२.२ अपार्चर असून हा कॅमेरा एचडी रेकॉर्डींग करू शकतो.

नवीन आयपॅडमध्ये अ‍ॅपल कंपनीचा सिरी हा व्हाईस कमांडवर चालणारा डिजीटल असिस्टंट देण्यात आला आहे. यामध्ये ३२.४ वॅट क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर १० तासांचा बॅकअप देते. यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅन, ब्ल्यु-टुथ आदी फिचर्स आहेत. नवीन आयपॅड मॉडेलचे ३२ जीबी स्टोअरेज असणारे आणि फक्त वाय-फाय कनेक्टीव्हिटी असणारे मॉडेल २८,००० रूपयात मिळणार आहे. तर ३२ जीबी स्टोअरेजचेच आणि वाय-फाय सोबत सेल्युलर कनेक्टीव्हिटी असणारे मॉडेल ३८,६०० रूपयात मिळेल. तर ग्राहकाला अ‍ॅपल पेन्सीलसाठी ७६०० रूपये मोजावे लागणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here