असूसतर्फे नव्या गेमिंग नोटबुक्स श्रेणीचे अनावरण

0

असूस कंपनीने आपल्या रिपब्लिक ऑफ गेमर्स म्हणजेच ‘आरओजी’च्या अंतर्गत नव्या ईस्पोर्ट्स गेमिंग नोटबुक्स श्रेणीचे अनावरण केले.

या अंतर्गत आरओजी स्ट्रिक्स हिरो एडिशन, स्कार एडिशन, स्ट्रिक्स जीएल ५०३ आणि गेमिंग एफएक्स ५०३ लॅपटॉप सादर करण्यात आले आहेत. याचे मूल्य ६९,९९० रुपयांपासून सुरू होणार असून हे सर्व मॉडेल्स प्रमुख ऑनलाईन संकेतस्थळांवर आणि ऑफलाईन माध्यमातून रिटेल भागीदार आणि वितरकांकडे उपलब्ध आहेत.

आरओजी स्ट्रिक्स स्कार एडिशन ही गेमिंग लॅपटॉप सिरीज फर्स्ट-पर्सन शूटर्ससाठी (एफपीएस) तयार करण्यात आली आहे, या सिरीजमध्ये खास १५.६ इंच डिस्प्ले, २.३ सेमीचे प्रोफाइल व २.५ किग्रॅ इतक्या कमी वजनाची फ्रेम अशी वैशिष्ट्ये आहेत. तर, असूस गेमिंग जीएल ५०३ या वाजवी दरातील गेमिंग नोटबुकचे वजन फक्त २.५ किग्रॅ आहे. या नोटबुकचे वजन अतिशय कमी असले तरी ही नोटबुक सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्यासाठी तयार करण्यात आली आहेत.

आरओजी स्ट्रिक्स स्कार एडिशनमध्ये एफपीएस फाइटर्स, आधुनिक इंटेल कोअर आय७ प्रोससर्स, एनव्हीआयडीआयए जीफोर्स जीटीएक्स १०७० सिरीज ग्राफिक्स कार्ड देण्यात आले आहेत. आरओजी स्ट्रिक्स हिरो एडिशन गेमर्सना आपले गेमिंग कौशल्य दाखवण्याची सुविधा देते. या सिरीजमध्ये शक्तिशाली इंटेल कोअर आय७ प्रोससर्स, एनव्हीआयडीआयएच जीफोर्सच जीटीएक्स १० सिरीज ग्राफिक्स आदींचा समावेश आहे. स्ट्रिक्स हिरो एडिशनमध्ये आकर्षक रंग, १२० हर्ट्झ वाइड-व्ह्यू आयपीएस डिस्प्ले, व्हिक्टरीसाठी तयार करण्यात आलेले डेस्कटॉप-स्टाइल किबोर्ड यांसह प्रत्येक इनपुटला जलद, अचूक प्रतिसाद मिळण्यासाठी एन-की रोलओव्हर आणि टिकाऊपणाच्या खात्रीसाठी २०-मिलियन-की-प्रेस लाइफटाइम ही वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.

आरओजी स्ट्रिक्स जीएल ५०३ या सिरीजमध्ये डेस्कटॉप डिझाइनमधून प्रेरित नवीन किबोर्ड लेआऊट, चार हॉटकिज आणि चार आरजीबी-बॅकलिट झोन समाविष्ट आहेत. एर्गोनॉमिक ०.२५ मिमी खोल कीकॅप कर्व्ह सुलभ टचचा आनंद देते. या लॅपटॉपमध्ये इंटेल आय ७-७७०० एचक्यू सीपीयू व एनव्हीआयडीआयए जीफोर्सऍ जीटीएक्स १०५० ग्राफिक्स आहे. इंटेलिजण्ट ड्युअल फॅन कूलिंग डिझाइन थ्रॉटलिंगशिवाय ग्राफिकली-सक्षम गेमिंगची सुविधा देते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here