अलेक्झा असिस्टंटयुक्त अमेझॉन फायर टिव्ही क्युब

0

अमेझॉन कंपनीने अलेक्झा या व्हाईस असिस्टंटने सज्ज असणारा फायर टिव्ही क्युब बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

अमेझॉनच्या अलेक्झा या व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी प्रणालीवर आधारित डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटची माहिती आपल्याला असेलच. याचा सर्वात लोकप्रिय वापर हा अमेझॉनने आपल्या इको या मालिकेतील विविध स्मार्ट स्पीकर्समध्ये केलेला आहे. तर याच कंपनीने आधी फायर टिव्ही हे स्ट्रीमिंग करणारे उपकरण बाजारपेठेत उपलब्ध केले आहे. याच्या मदतीने स्मार्टफोनवरील विविध कंटेंट हे टिव्हीवर पाहता येते. आता अमेझॉनने या दोन्ही उपकरणांना एकत्र करत अमेझॉन फायर टिव्ही क्युब हे नवीन डिव्हाईस बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. नावातच नमूद असल्यानुसार हे क्युबिकल आकारमानाचे उपकरण आहे.

अमेझॉन फायर टिव्ही क्युब या मॉडेलमध्ये अलेक्झा इनबिल्ट अवस्थेत असल्यामुळे याच्या माध्यमातून युजर संगीत ऐकणे, हवामानाचे अलर्ट, बातम्या आदींसह याला कनेक्ट असणार्‍या घरगुती उपकरणांचे कार्यान्वयन करू शकतो. याशिवाय कॉल करणे वा रिसीव्ह करणे, संदेश पाठवणे अथवा रिसिव्ह करणे आदी बाबीदेखील याचा वापर करून करता येणार आहेत. युजरच्या ध्वनी आज्ञावलीसाठी यामध्ये ८ अतिशय संवेदनशील स्पीकर्स लावण्यात आले आहेत. याच्या जोडीला स्ट्रीमिंगशी संबंधीत व्हाईस कमांडदेखील यावरून देता येतील. तर आधीच्या अमेझॉन फायर स्टीकप्रमाणे याचा वापर करून टिव्हीवर स्मार्ट उपकरणांवरील कंटेंट पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात चॅनल बदलणे, आवाज कमी-जास्त करणे आदी बाबी अलेक्झाच्या कमांडच्या माध्यमातूनच पूर्ण होणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे याच्या मदतीने फोर-के युएचडी या क्षमतेचे चित्रीकरण पाहता येणार आहे. यात एचडीआर १० व डॉल्बी अ‍ॅटमॉस साऊंटचा सपोर्टदेखील आहे. तसेच याच्या चारही बाजूंनी इन्फ्रारेड ब्लास्टरची सुविधा असणारा रिमोट कंट्रोल दिला आहे. यामुळे याचा युनिव्हर्सल रिमोट म्हणूनदेखील वापर करता येणार आहे. यामध्ये वायरलेस आणि वायरयुक्त कनेक्टीव्हिटी देण्यात आली आहे. यामध्ये वाय-फायसह एचडीएमआय, मायक्रो-युएसबी, इथरनेट आदींचा समावेश आहे. याच्या वरील बाजूस अतिशय आकर्षक एलईडी देण्यात आले आहेत. तर याच्याच मागे आवाज कमी-जास्त करण्याची बटने देण्यात आली आहेत. हे मॉडेल पहिल्यांदा अमेरिकेत सादर करण्यात आले असून ते लवकरच भारतासह अन्य राष्ट्रांमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

पहा : अमेझॉन फायर टिव्ही क्युबची कार्यप्रणाली दर्शविणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here