अरेच्चा…फेसबुकवर स्वयंचलीत कॉमेंटची सुविधा !

0

फेसबुकवर स्वयंचलीत म्हणजेच अ‍ॅटोमॅटीक पध्दतीत कॉमेंट करण्याची सुविधा देण्यात येणार असून काही युजर्सला हे फिचर दिसू लागले आहे.

फेसबुकवर कधी स्वयंचलीत पध्दतीत कॉमेंट करता येईल असे आपणास सांगितले असते तर कुणाचाही विश्‍वास बसला नसता. तथापि, आता मात्र याच प्रकारची सुविधा फेसबुकच्या सर्व युजर्सला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे फिचर नेमके कसे असेल याबाबत संपूर्ण विवरण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. तथापि, जीमेलमध्ये असणार्‍या स्मार्ट-रिप्लाय या फंक्शनप्रमाणे याचे कार्य राहील असे स्पष्ट झाले आहे. अर्थात फेसबुक पोस्टवरील काही अपेक्षित कॉमेंट युजरला दिसणार असून यातील तो हव्या त्या कॉमेंटला निवडून ती पोस्ट करू शकतो. यात सर्वात जास्त प्रमाणात वापरल्या जाणार्‍या प्रतिक्रियांचा समावेश असणार आहे. याशिवाय, या फिचरच्या अंतर्गत विविध प्रकारच्या इमोजी वापरण्याची सुविधादेखील मिळणार आहे. काही युजर्सला हे फिचर दिसू लागले आहे. अर्थात, पहिल्या टप्प्यात फक्त लाईव्ह व्हिडीओजसाठी ही सुविधा मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

फेसबुकने अलीकडच्या काळात युजर्सचा सहभाग (एंगेजमेंट) वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी नवनवीन फिचर्स देण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून स्वयंचलीत प्रतिक्रिया हे फिचर रोलआऊट करण्यात येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here